आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार
नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
श्री नानासाहेब बोरस्ते, श्रीमती सुमती पवार, श्री श्रीकांत बेणी, श्री लक्ष्मण महाडिक, श्री मिठे सर, श्री उत्तमराव कोळगावकर सुरेश पवार, रविंद्र मालूंजकर, किरण सोनार आदी मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योगपती श्री देवकिसनजी सारडा साहित्य नगरी, भावबंधन मंगल कार्यालय, मखमलाबाद रोड, पंचवटी, येथे आहेर यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा परिसरातील अनेक मान्यवर कवी, लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.