सुंदर माझे जातं
फिरते बहू सुंदर माझे जातं
पडतंय पीठ ,सरलीया रातं
साफ करी कुंचाने पाळीचं पीठ
आता झाली पहाट ,वाजे रहाट
दुरडीच्या खेपा घेऊन चाले झपाझपा
दिस आला वरि, करी भाकरी धपाधपा
काळया कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगू हुंगूनिया करी कशी मज बेजार
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर करि जशी माय
पहाटेपासून घरधनी हाय मळ्यामंदी
मोटेला चालती सर्जा राजा दोननंदी
निघाली मालकीण मळ्यात पांधीनं
डोईवर घेऊन पाटी चालली बिगीनं
पाटाचं पाणी बाई गं वाहे झूळू झूळू
बहरला हा शेतात हिरवागार शाळू
सांजेला आले हो मालकासंग घरा
सुंदर माझे जाते गं फिरते गरागरा
आयुष्याचे दिवस जाती भराभरा
रचनाकार: आहेर वा.र. नासिक
9958782982