संत चोखामेळा
जोहार मायबाप जोहार घालती
ओलांडू पाहे जातीच्या भिंती
मनी आस विठू दर्शनाची होती
सांगे परि बडवे मज मारिती ॥१॥
दाजी बंका बहिण निर्मळा,
बाईल सोयरा, पुत्र कर्ममेळा
मंगळवेढा, पंढरपुर कर्मभूमी
विदर्भि मेहूणराजा जन्मभूमी ॥२॥
चोखोबा घरी पांडुरंगे दहीभात चाखला
म्हणती नतद्रष्ट चोख्या पांडुरंग बाटला
परि भगवंत भक्तिभावाचा भूकेला
बोलावी देव मध्यरात्री दर्शना चोख्याला ॥३॥
प्रेमभावे दिधला चोखोबाशी कंठीचा हार
हार चोरला म्हणती चोख्याने,छळले अपार
बैलाचे पायी तुडविले केले कृत्य अघोर
कारण विठ्ठल भक्तीचा अपराध केला थोर ॥४॥
केला समतेचा प्रसार चोखा अभंग रचती
चोखा नसे डोंगा,तयाची हाडे हरीनाम बोलती
पुढे सहवास लाभला नामयाच्या घरी
नामदेवे बांधिली समाधी महाद्वारी ॥५॥
आहेर वा.र, नासिक