संगणक रुसला!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रात्रीस हाखेळ चाले, घाम अंगाशी आला|
निथळून घामाने संगणक ओला झाला||
शुक तारा, मंद वारा, नाही अनुभवला|
पहाटे तुला पांघरणे, नाही जमले मला||
कारण पहाटे माझा संगणक रुसला||१||

उठी झडकरी उदयाचळी मित्र आला|
नेट नाही, प्रकल्प माझा अधुरा राहिला||
कमी पडला शक्तीने संगणकाचा राम|
झालो हतबल मी म्हणतो आता हे राम||
कसं काय करू माझा संगणक रुसला||२||

पीझा बर्गर, न्युडल, खायला देई राणी|
न मिळे उपमा, थालीपीठ,नारळपाणी||
चित्रातच पाहतो तुप दही दूध लोणी|
कानाने ऐकूच येईना संगणक वाणी||
वाटतेय जणू  माझा संगणक रुसला||३||

फाईल बंद, स्क्रीनही बंद मार्ग दिसेना|
ईमेल, रिपोर्ट तयार करून जाईना||
चाट जीपीटी, ड्राॅपबाॅक्स व्हाॅईसथांबला|
त्याला परोपजीवी जंतूंचा संसर्ग झाला||
वाटतेय जणू  माझा संगणक रुसला||४||


आहेर वाळू रघुनाथ , नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »