|| गुरू वाणी ||

या देशात गुरूंची परंपरा थोर|
श्रीव्यास, वशिष्ठ, वाल्मिकी,पराशर||
श्रीगुरूचा महिमा अनंत अपार|
जपतप, कर्मकांड ,व्यर्थ व्यापार||१||
गुरूच्या साथीने संकटे जाती दूर |
गुरू उपदेशे मिळे यश अपार ||
अंतर्मनाच्या भावना जाणती गुरू|
जणू उकळत्या पाण्याचीवाफ गुरू||२||
गुरू विनाअशक्य होय ध्येयपूर्ती |
गुरू विना अपुर्ण ही लेखनपुर्ती||
प्रगती अशक्य आहे गुरूच्या विना|
गुरूच सार्थकी लावतील जीवना||३||
गुरूकृपेने देशाचे सार्थक झाले|
विद्वानांचे नवीन विचार रुजले||
आमचा उत्साहआहे खुप झकास|
शिक्षकाशिवाय शक्य नाही विकास||४||
गुरूमुळे महत्व विचाराला आहे|
गुरूमुळे श्वासही माझेधन आहे||
गुरूकृपेने यश जवळ येईल|
गुरूचाआशीर्वाद कल्याण करील||५||
ईश्वर प्राप्तीसाठी काय येई कामी|
गुरूचरणी शरण, उपाय नामी||
आपल्यासारखे गुरूजन असावे|
उगाच भविष्य बघून का फसावे||६||
– वाळू रघुनाथ आहेर, नाशिक