तू आल्यावर घराला घरपण आले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पहिल्यांदा घराला सोळा खांब लावले|
आता खांब गेले, घर एकखांबी झाले|
तू आल्यावर घराला घरपण आले||१||

आधी भाऊबीजेला भेटायची बहीण|
आता पोस्टाने करदोटा धाडी बहीण|
तू आल्यावर घराला घरपण आले||२||

पहिले भाऊ घरी  चौकशी करायचे|
आता कधी फोनवर हाय म्हणायचे|
तू आल्यावर घराला घरपण आले||३||

आधी आईला दोन दिसं जास्त व्हायचे|
आता आठ दिवसांला नाही भेटायचे|
तू आल्यावर घराला घरपण आले||४||

पहिले रोज पाव्हणे घरी असायचे|
आता मात्र काळं मांजराला भेटायचे|
तू आल्यावर घराला घरपण आले||५||

आधी घरी दारी  असे मित्रांचा वावर|
ती येईल म्हणती, आवरा लवकर |
तू आल्यावर घराला घरपण आले||६||

आधी शेजारी  कायम बसे अंगणात|
आता फक्त काळं कुत्रं बसतं दारात|
तू आल्यावर घराला घरपण आले||७||

घर असावे छान, नको नुसत्या भिंती|
घरी हवी माणूसकी, त्याला नको क्षती|
तू आल्यावर घराला घरपण आले||८||

(विडंबन कविता)

वाळू रघुनाथ आहेर , नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »