अरे माणसा माणसा

अरे माणसा माणसा |
जै डोंबारी तारेवर||
तै समतोल नजर|
मग मिळेल भाकर||१||
अरे माणसा माणसा|
खोटं कधी बोलू नये||
सुगरणीच्या घरट्याला|
खोपा, कधी म्हणू नये||२||
अरे माणसा माणसा|
निसर्गाची कला न्यारी||
जरि शेंग ती काटेरी|
सागरगोटे अंतरी||३||
अरे माणसा माणसा|
माझ्या जीवाचा मैतरं||
आहे मोठा जादूगार|
त्यांवर माझी मदार||४||
अरे माणसा माणसा|
दोन जीवांचा विचार||
नगद कधी उधार|
सुखदुःखाचा व्यापार||५||
अरे माणसा माणसा|
नको दुखणं कुढणं||
वेड्या गळ्यातला हार|
म्हंजी नाही ते लोढणं||६||
इंजि.आहेर वाळू रघुनाथ, नाशिक





