असला दादला नको ग बाई…
आईबापाचा भावाबहिणीचा
वडील धा-यांचा लहान मोठ्यांचा
मानसन्मान ठेवत नाही त्यांचा
असला दादला नको ग बाई ॥१॥
गरीब श्रीमंतीचा भेद पाळणारा
मानापमान नाटय करणारा
ख-या खोट्याची चाड नसणारा
असला दादला नको ग बाई ॥२॥
नोकरी धंद्यात रस नसणारा
पारावर गप्पा मारणारा
फुकटात पंढरपूर करणारा
असलादादला नको ग बाई ॥३॥
तुझे ते माझे मानणारा
अपुरी बुध्दी असणारा
खंडीच्या वरणात मुतणारा
असलादादला नको ग बाई ॥४॥
सीतेचा राम नसणारा
सावित्रीचा सत्यवान नसणारा
लग्नाची बेडी नको असणारा
असला दादला नको ग बाई ॥५॥
परदारा मातेसमान मानणारा
पाहुणा ईश्वरासमान मानणारा
माझा सखा असणारा
असला दादला हवा ग बाई ॥६ ॥
रचनाकार:
आहेर वा.र. (नासिक)
बी.ई.एमआयई.बीओई 9958782982