मना सज्जना…

बेईमान होऊ नये|
सज्जनाशी भांडू नये||
नीचासवे बांटू नये ।
तस्कराशी पुसू नये ॥१॥
सांडावर बसू नये ।
भ्रष्टाचार करूनये ||
अक्रीताला भाळू नये ।
चव्हाट्यात राहू नये ॥२॥
भक्तिमार्ग खंडू नये ।
कुभांडयासी तंडू नये ||
खळासंगे भांडू नये |
सज्जनाला छळू नये ||३||
तरू शेंडे डाळूं नये ।
केला नेम टाळू नये ||
सद्गुरु सेवा सोडू नये |
कुलधर्म सोडू नये ||४||
पापद्रव्य जोडू नये |
संपत्तीने माजू नये ||
अभिमाने फुगू नये ।
सभेमध्ये लाजू नये ॥५॥
खोटा वाद घालू नये ।
खोटा संग धरु नये ||
अनाचार करु नये ।
ढोंगीपणा करु नये॥६॥
जन्मा आलिया स्वभावे ।
काही सार्थक करावे ||
ऐसे मना विचारावे |
आदराने मनोभावे ||७||
अतिथी देव मानावे|
भेदभाव न करावे||
संताशी शरण जावे ।
सदा हरिनाम गावे ॥८॥