|| देशभक्तीच्या झळा ||

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|
तु  तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||
पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|
सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१||

दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद ‌मानला|
दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||
दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|
तु आपले दुःख आपल्या  मनात ठेवलं ||२||

सर्वाच्या  वाटेवर दीपस्तंभ उभारला|
सर्वांच्या मार्गातील अंधकार दूर केला||
पण जेंव्हा झुळूक तुझ्या अंगावर आली|
तेव्हा मात्र तुझीच ज्योत विझवली गेली ||३||

आपलं स्वत्व  तु सर्वांना समर्पित केले|
प्रत्येकाच्या हाकेला तेव्हा प्रतिसाद दिला||
पण जेंव्हा संकटात तु किंकाळी फोडली|

तेव्हा मात्र सगळ्यांनी हाके लाओ टाळली |४||

आता थोडं थांबून, काही क्षण जगून घे|
एकदाच स्वतःच्या मनाला विचारुन घे||
नाही तर शेवटी संवाद काय  होईल|
मग तुझी सावलीसुध्दा तुझी का राहील ||५||


आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »