गणगोत
का करती गणगोताची चौकशी
कुठे हाय काका, मामा न मावशी
मी हा अनाथ, माय असते कशी
लहानपणीच बाप गेला फाशी ||१||
ना जमीन,ना घरा दाराचा पत्ता
पण ही चौकशी का करता आता
वयात आलो म्हणून विचारता
लगीन घाई साठी ही तत्परता ||२||
वर आकाश अन् खाली धरती
चौकात दोनच गाठोडे असती
भुकेला कोंडा अन निजेला धोंडा
नाही पाहिली पुरणपोळी मांडा||३||
वंश, धर्म मायबाप जातीपाती
स्थळ काळ वेळ नाही मज हाती
पुत्र मानवाचा पराधीन जगती
नभीचा चंद्र भाकरीत पाहती ||४||
गणगोत ही आपलीच माणसं
नडीला दूर जाती हीच माणसं
कुठं गायब होवून बसतात
जवळ असणारे लांब जातात ||५||
लांबचे मात्र मदत करतात
तीच मायेची माणसं असतात
गणगोतातले हे आपल्यासाठी
जीव ओवाळून टाके माये पोटी ||६||
रचनाकार: आहेर वा.र. (नाशिक)
९९५८७८२९८२