हीच खरी दिवाळी अन् पाडवा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आली दिवाळी,गरीबा घरी आली दिवाळी
परि दौलतीची तर नित चालते दिवाळी
आनंदे बहरली झोपडी चंद्रमौळी
सडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१||

रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊले
वसुबारसेला गोधन पुजले
धनतेरसेला धन्वंतरी पुजले
नरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२||

लावले आकाशदिवे अन  झेंडूच्या माळा
दिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळा
केला गोडधोड नैवेद्य पुरणपोळी
निघे दिवाळं, तरी साजरी केली दिवाळी ||३||

येई नवे धान,नव वरीसं होई पावन
बाईल म्हणे धनी माझा सत्यवान
वाजती फटाके, दणाणले आसमंत
जरी असलो गरीब तरी मन श्रीमंत ||४||

बहीण येई घरा भाऊबीजेच्या सणाला
ओवाळते  आनंदाने बहीण भावाला
फुलते तोरणं पानाफुलांचे दारा वरती
बोलवा स्नेही,फराळाच्या उठवा पंगती||५||

प्रेम,माया विश्वास वाढे एकमेकांत
वात्सल्य, प्रेम आपलेपणा वाढे मनात
हीच खरी दिवाळी वसते जन मनात
फराळ, सजावट तोरणांचा नसावा दिखावा
हीच खरी दिवाळी अन् हाच खरा पाडवा||६||

रचनाकार: आहेर वा.र.

नासिक.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »