मैत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उद्या असेन मी नसेन मी |
पण मित्रांसवे असेन मी ||
चांगले करीन मित्रांचे मी |
वाईटाचा धनी होईन मी||१||

नका माझे उपकार ठेऊ|
पण दोष नका मला देऊ||
निरोप द्यायला नका येऊ |
पण विसरू नको रे भाऊ||२||

आपली जुळली आहे नाळ|
भल्या बु-याला बघेल काळ||
जराही नाही शिजली दाळ|
उगवतीचे स्वागत बाळ ||३||

असफल वचनही  नाही|
शिव्याशाप, लोभ नको काही||
ते तर  मी माझे काम केले |
दूसरे तिसरे  नाही काही||४||


इंजि.वाळू रघुनाथ आहेर, नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »