पाळणा

झोप रे माझ्या सोनुल्या|
नका रे वाजवू चाळ ||
झोपले जग हे सारे |
झोपेल इवले बाळ||१||
वारा गाईल अंगाई| .
म्हणे कर गाई गाई||
झोका देते तुज आई|
येऊ लागली जांभई||२||
खेळणी सारी झोपली|
स्वप्नी पाळणा हलला|
चांदोमामा वर झोपला|
निद्रेत दंग जाहला||३||
कित्येक प-या येतील|
तुला घेऊन जातील|| .
सुख सोहळा होईल|
सुरेल गाणी गातील||४||
झोपले गं बाळ माझे |
बाई मिटली पापणी||
बाळ सुखी ठेव देवा |
हीच माझी विनवणी||५||
इंजि.कवी: वाळू आहेर , नाशिक






