उठ मुला!

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|
चिमणीताईने चिवचिव केलं||
उठी उठी लवकरी मम सुता|
बाहेर तांबडं फुटलंय आता||१||
कळ्यावर फुलपाखरू डोले|
गारव्याने मन आनंदाने फुले||
आजीआजोबा फिरुन परतले|
मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२||
काकांनी देवपुजा अर्चना केली|
ताई दादाची पण आंघोळ झाली||
बाबांची हाक ऐकू न आली तुला|
निघ नां वेळेवर बाळ शाळेला||३||
उठा,स्नान करा,अन नाश्ता करा|
शाळेत शिका, अभ्यास करा||
गुरुंना मनातले प्रश्न विचारा|
खेळून निरोगी बनवा शरीरा||४||
जगात तुझे येण्याचे ध्येय आहे|
मानवधर्म पालन करु पाहे||
आईबापाची हीच अपेक्षा आहे|
जग कल्याण झालेलं तुच पाहे||५||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक