सखीच्या मनात

तु माझ्याकडे बघून हसत राहिली|
मग मीही काही प्रेमाची गाणी गायली||
नाही कधी वाकडी नजर मी टाकली|
खुपजणांच्या जाळ्यात मी नाही फसली|१|
तुजला बघुन नजर म्हणू लागली |
बाजूला व्हायला मी काही अडाणी नाही ||
तु जर अशीच माझ्या डोळ्यात भरली|
तर डोळे झाकणेही मला सोपे नाही||२||
सालों-साल जे विचार मनात रूजले|
त्यातील एका विचाराला कायम केले||
मी तुझी सखी, बरे झाले तुला कळले|
पाडसाविण घायाळ मी हरिणी झाले||३||
तुला मी खरोखर आवडत असेल|
तर तु मैफलीचा बादशहा होशील||
तुझी पावलं माझ्या सोबत पडतील|
मग मीही अशीच गाणे गात राहिल||४||
माझ्या एकटीच्या जवळ कोणी नसेल|
हा जीवनाचा प्रवास नकोसा वाटेल||
तुझ्यामुळे सफर मजेशीर होईल|
आकाशातील तारेही कवेत येतील||५||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक