मी भरारी घेईन !

मी शांततेने बसलो, शब्दांच्या बाजारात|
इतरांशी प्रत्येकजण होता बोलत||
ना बोललो काहीच,ना ऐकलं काहीच|
मी लढत होतो स्वतःच्या विचाराशीच||१||
विचार लिहिलेली ओळं पुसली गेली|
भेंडी बाजारात शांतता प्रिय वाटली||
तेव्हा कळलं,अन मी मौन बाळगले|
ना रडलो,हसलो,बस्सं विलोम केले||२||
सर्वांना ठीकठाक दिसलो बाहेरून|
तरी मी आतून पडलो कोलमडून||
तेव्हा खुप प्रश्न माझ्या समोर पडले|
प्रत्येकाचे मी हसतच उत्तर दिले||३||
जेव्हा शब्दबाणांनी मला घायाळ केले|
तेव्हा माझ्या मौनाच्या ढालीनेकाम केले||
मी शांत बसलो,पणहरलो नाही मी|
फीनिक्स पक्ष्यासम भरारी घेईन मी||४||
आहेर वाळू रघुनाथ , नाशिक






