मन पाखरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मन पाखरू उडू लागे गगनात|
स्वछंदाने बागडतो मी दुनियेत ||धृ||

झाली सकाळ आज  माझे जीवनात|
मावळे निराशेचा अंधार मनीचा |
मी गाणे गाई शेताच्या हिरवळीत||
नाही कुणाचा माझे मनांशी पहारा|
जीवनात रंग भरले निसर्गाने |
स्वछंदाने बागडतो मी दुनियेत||१||

मन पाखरू उडे ऋतु वसंतात|
मन खेळे झ-याशी वाहत्या पाण्यात |
मन खेळते चंद्र सुर्य तारकात ||
मन आवरू पाहे आकाश कवेत |
मन गाई गीत आपल्याच तो-यात|
स्वछंदाने बागडतो मी दुनियेत ||२||

पांघरतो मी मेघांची ओढणी |
घालतो पायी मी बिजलीचे पैंजण |
मेघांचे  काजळ दिसे नेत्रात||
माझे जीवन आहे प्रवाही सरिता |
जीवनी लहरी उठति थंड वा-यात|
स्वछंदाने बागडतो मी दुनियेत ||३||

रचनाकार – आहेर वा.र. (नाशिक)
९९५८७८२९८२

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »