जगाचा पोशिंदा भावाचा भुकेला

स्नानसंध्या पुजअर्चा हे आपल्यासाठी |
याला जराही पाहत नाही जगजेठी||
देव स्वतः नाही करत या वाटाघाटी |
देवा़लाच नकोय या साऱ्या कटकटी ||१||
नको ईश्वराला फुलहार जपमाला|
देव विश्वाचा माळी,त्याचीन्यारीच लीला ||
सत्यभामेच्या दारी लावला पारिजात |
फुले पडती हो रुक्मिणीच्या परसात||२||
जगाचा पोशिंदा आहे भावांचा भुकेला |
मग नैवेद्यम समर्पयामि कशाला ||
द्रौपदीच्या थाळीत एक मेथीचे पान|
तयाने तृप्त होऊन गेले भगवान ||३||
ओवाळीतो निरांजन ज्योती इवलीशी|
सुर्य चंद्र रोजचंओवाळती आकाशी||
दांभिकता ही ग्रंथ पठण,सुक्त वाचन|
नकोच भाटांचे स्तुती पाठाचे चर्वण||४||
तो प्रेमळ निर्गुण निराकार ओंकार|
कंटाळला मंदिरातल्या सोपस्काराला||
सारे काही चालविले त्या मतलबींनी|
नित्य भेटतो जळीस्थळी काष्ठीपाषाणी||५||
भुरका आमटी जोरदार आवाजात|
कधी पोटपूजा करा कांदा भजी खात||
यांत काही पाप नाही सांगे उत्साहात|
हसा खेळा आनंदाने जगा आरामात||५||
रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)