|| संदेश सुखी जीवनाचा ||

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पांखरासारखे उडायला शिका |
फुलपाखरांचे   बागडणे शिका ||
भ्रमरां सारखा  गुंजारव शिका|
या ता-यांसारखी एकाग्रता शिका ||१||

सुर्यासारखेच तेजस्वी व्हा|
चंद्रासारखेच शीतल व्हा||
ध्येयच आपले लक्ष करा|
निसर्गावरहि प्रेम करा||२||

सागरासम विचार करा |
प्राणीमात्रां वर दया करा ||
आधुनिकतेची कास धरा |
जगाला प्रेम अर्पण करा ||३||

लव्हाळ्या सारखे स्वतः विनम्र व्हा|
परिस्थिती नुसार जाणकार व्हा ||
आळस टाकून कार्यरत व्हा|
कठीण समयास धीरोदात्त व्हा ||४||

 नेहमी समाधानी वृत्ती ठेवा |
पर्वतासम  ध्येय उच्च ठेवा||
सर्वाभुताशीं समभाव ठेवा |
ज्ञानाचा संग्रह करून ठेवा||५||

चांगल्या  मित्रांची संगत ठेवा |
अन कामक्रोध बाजूला ठेवा ||
क्षणभर म़ोह बाजूला ठेवा |
विचारशक्तीला जागृत ठेवा ||६||

किना-यासारखे मर्यादेत रहा |
काळाची पावलं ओळखून रहा||
निसर्ग  कृतीतून संदेश देतो|
याद्वारे देवही रूप दाखवतो ||७||

रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)
(बीई एमआयई बीओई )
९९५८७८२९८२

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »