माझ्या दिलवरा

आडरस्त्यावर नको सोडून जाऊ मला,
एखाद्या वळणावर नको सोडून जाऊ मला.
खिंड लढवू या पण नको सोडून जाऊ मला,
हट्ट करून नको सोडू माझ्या दिलवरा. ॥१॥
मनात जे येतं तसं नको घडायला,
तुझा जिव्हाळा विरंगुळा वाटे मला.
नको दूर जाऊ, भीती वाटते मला,
शोधीन तुला दारोदार माझ्या दिलवरा. ॥२॥
तुझा रंग बहारदार, मोहक जणू,
तुझे रूप आरसा वाटे प्रेमाची धेनू
मावेना नजरेत पसारा दिलाचा जानू
नजर लागेल तुला माझ्या दिलवरा. ॥३॥
तुझा सहवास हाच जीवनाचा श्वास,
तुझं प्रेमच आहे माझ्या आशेचा प्रकाश.
ठाऊक नाही कधी जातील हे दिस
पण आशा अमर आहे माझ्या दिलवरा. ॥४॥