नव्या युगातील स्त्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

स्त्री-पुरूष समानतेचं वारं आल॔
साहेब भांड्याशीं झोंबी खेळण्यात संग
साहेबीण क्लबमध्ये मैफलीत दंग
घेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥१॥

साडी चोळी गेली, शर्ट पँट आली
पार्श्वभागी फाटलेली जीन कटीवर बसली
आरस्पानी कंचुकीने लाज झाकली
घेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥२॥

पबमध्ये जाऊन नाचूया, गाऊया
आनंद घेऊन झिंगाट होऊया
आयटीच्या पोरीचा नाद करायचं नाही
घेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥३॥

स्त्री अनंतकाळची माता, अन क्षणभराची पत्नी
पण लिव्हिंग रिलेशनशीप मध्ये पत्नी नाही
अहो पत्नीच नाही तेव्हा माता होणे शक्य नाही
घेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥४ ॥

कुंकू मंगळसूत्र दिसत नाही सौभाग्याचे लेणे
आता स्त्रीने स्त्रीशी स्त्रीसारखेच वागणे
हीच आमची प्रार्थना हेचि आमुचे मागणे
घेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥५ ॥


रचनाकार: आहेर वा.र.

बी.ई.एमआयई.बीओई (9958782982 )
लक्ष्मीपार्क बी/3, सावरकरनगर गंगापूर रोड नासिक 13

(टीप : साखर उद्योग क्षेत्रात अनेक चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्याचे आम्ही स्वागत करतो. कृपया ‘शुगरटुडे’ला आपले लेखन पाठवावे.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »