व्यथा साखर कामगाराची
मी आहे साखर कामगार ,साखर कामगार
कुणीही हाका , ठोका , जणू मी आहे वेठबिगार
मी आहे स्कील्ड, सेमीस्कील्ड, सिझनल, टेम्पररी
कंत्राटी, अनस्कील्ड, उक्ता, धरणग्रस्त, बिगारी ॥१॥
आम्हास अजून नाही पाचवा वेतन आयोग
सुरू झाला सरकारी आठवा वेतन आयोग
लुळया पांगळ्या हो आमच्या कामगार संघटना
पाटील ,पवार कमिटी ही आमची खरी घटना ॥२॥
संघटनेला मिळे वाढीव वर्गणी आपोआप
मागे सारती मग वेतन आयोग चुपचाप
आमचा अन टाटा कंपनीचा रात्रपाळी भत्ता
यातील तफावतीवर नाही हो आमची सत्ता ॥३॥
तुम्हा सवलती मिळतील ग्रामीण भागातील
कामाची गुणवत्ता पाहिजे अव्वल जगातील
इलेक्शनला चेअरमन साठी प्रचार करा
किंवा घरी बसा ,आयुष्यभर हरी हरी करा ॥४॥
आम्ही साखर कामगार आता जीव किती जाळू
दादा, नाना, आबा अन साहेब व्हा हो कनवाळू
आयटीचं नाॅलेज वापरा कारखान्यावरती
साखर कामगाराला नका सोडू वा-यावरती ॥५॥
रचनाकार: आहेर वा.र. (नासिक)
9958782982