नारीशक्तीचे गर्वगीत
मी बदलापूरची, मी कोपर्डीची
मी पुण्याची, मी हाथरसची
मी मणिपूरची, मी कलकत्त्याची
मी मुंबईची, मी दिल्लीची
सगळे टपले मला छळण्याला
शिका-याचे सावज करण्याला
लंपट वृषण ग्रंथीहीन जणू गिधाडे
अबला मी कोण करील काय वाकडे॥२॥
मी नारायणी , मी झांशीवाली
मी दुर्गावती, मी मां काली
मी चामुंडा मी झंडावाली
स्वसंरक्षणास मी शेरांवाली ॥३॥
दणकट दंडस्नायू, जैसे
लोखंडाचे वळले नाग,
काळ्याकभिन्न मांड्या जैसे
पोलादाचे चिरले साग ॥४॥
स्री रक्षणा वाट पाहति दारी
छत्रपतींनी जन्म घ्यावा शेजारी
यातनाचें दुःख ते भोगणार
आम्ही नथीतून तीर मारणार ॥५॥
देऊ नाठाळाचे माथी काठी
पाहुणे चालवतील लाठी
मी कल्पना चावला, मी सुनिता विल्यम
मी विनिता फोगाट, मी मेरी कोम ॥६॥
अनंत आमुची ध्येयासक्ती
अनंत अन आमुच्या आशा
किनारा तुज पामराला
सांगते खुळया लंपटाला॥७॥
रचनाकार:
आहेर वा.र.नासिक
बी.ई.एमआयई.बीओई