मुखी असे रामनाम !

गाठीला नाही दमडी
नाही खरचाया दाम||
नाही वेचली कवडी
मुखी असे रामनाम ||१||
होते बंधू शक्तीमान
भरत लक्ष्मणासम||
ज्यांचा तिन्ही लोकी डंका
मुखीअसे रामनाम ||२||
प्रभुचरण स्पर्शाने
पावन शबरीधाम||
पावन किरात गुहा
मुखी असे रामनाम ||३||
नाही मी सती अहिल्या
जरी ना मी वाल्यासम||
अप्रिय माझ्या सावल्या
मुखी असे राम नाम ||४||
रामभक्त हनुमान
ह्रदयात वसे राम||
तो करी लंकादहन
मुखीअसे राम नाम ||५||
नको अफवांचे पेव
भाव तेथे सिताराम||
नसे बाकी देवघेव
मुखीअसे राम नाम ||६||
इंजि.कवी-वाळू आहेर (नाशिक)






