‘अंतरीचे बोल’ काव्य संग्रहावर आहेर यांचे व्याख्यान

नाशिक : येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘पुस्तकावर बोलू काही’ या विषयावरील १११ व्या कार्यक्रमात साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या “अंतरीचे बोल” या कविता संग्रहावर त्यांनी व्याख्यान दिले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माणूस मित्र श्री. सुरेश पवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो.
हुतात्मा स्मारक येथे संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कवयित्री सौ.पाटील होत्या. सुरूवातीला श्री.बाळासाहब गिरी यांनी स्वागत केले आणि श्री.चिंधडे वकील यांनी श्री.आहेर यांचा सन्मान केला.
त्यानंतर श्री.आहेर यांनी त्यांच्या ओघवती भाषणात अंतरीचे बोल या काव्यसंग्रहात सर्व कविता आपल्या जीवनात आलेल्या अनुभवावरून लिहिलेल्या आहेत असे सांगितले. त्यात मुखपृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे परमेश्वर,आई, सामान्य माणसाच्या व्यथा आणि साखर उद्योग या चार महत्त्वाचे विषयांवर कविता लिहिल्या आहेत.
असा मी असामी, माझे जीवन कार्य, हुंकार, मी स्वप्नात ऊस लावला, आई, हरिनामाचा महिमा अशा विविध कवितांच्या ओळी सादर केल्या. सोबत आपल्या आयुष्याचा जीवनपट या कवितांचा आधार घेऊन मांडला. गरीबांच्या जीवनात डोकावून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला.
आजपर्यंत चाळीस एक टेक्निकल निबंध लिहून प्रसिद्ध केले आहेत. मराठीतही लेखन केले आहे, असे आहेर यांनी सांगितले.
कार्यक्रमास सर्वश्री नानासाहेब बोरस्ते (माजी आमदार), कवी बाळासाहेब गिरी, ॲडव्होकेट श्री व सौ चिंधडे, कवी संजय आहेर, राजेश जाधव, चारूदत्त अहिरे, केशवराव पवार, बी एम पवार, प्रा. नागरगोजे, बबन वाघ , ईपीएफ जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि सदस्य सुरेंद्र पगार, सौ. छाया आहेर, सुप्रिया आहेर, डॉ. रोहिणी कापसे आदी रसिक उपस्थित होते
(साखर उद्योग क्षेत्रात चांगले साहित्यिक, लेखक आहेत. त्यांच्या लेख आणि कवितांचे स्वागत आहे. शुगरटुडे मध्ये आपले साहित्य प्रसिद्ध केले जाईल . whatsapp no. 8999776721 )