साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक निरक्षरता संपवणार : आहेर

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी…
आजपर्यंत त्यांनी अनेक साखर कारखान्यांवर प्रत्यक्ष जाऊन, प्रात्यक्षिकांसह व्याख्याने दिली आहेत. त्याचा संबंधित साखर कारखान्यांना खूप फायदा झाला. ‘शून्य टक्के मिल बंद तास’ हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांच्या या मिशनचाच भाग आहे.
तांत्रिक निरक्षरता संपवण्याचे ‘मिशन’ श्री. आहेर यांनी हाती घेतले आहे. या ‘मिशन’बाबत अगदी संक्षिप्त स्वरूपात माहिती पुढीलप्रमाणे…..

साखर कारखानदारीतील मशिनरींची अद्ययावत माहिती कारखान्यावर जाऊन देणारे महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञ म्हणजे वा. र. आहेर.
तांत्रिक निरक्षरता घालवण्याचा विडा उचलणारे तज्ज्ञ..
1) ‘शून्य टक्के मिल बंद तास’ या विषयावर व्याख्याने
2) हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततात या विषयावर व्याख्याने
मागील एका ऑफ सीझनमध्ये 25 साखर कारखान्यांनी वरील विषयांवर व्याख्याने आयोजित केली, त्यामुळे मिल स्टॉपेजेस कमी झाले.
व्याखाते : श्री. वा. र. आहेर. (बी.ई. मेक, एमआयई, बीओई. एनर्जी मॅनेजर)
संचालक डीएसटीएपुणे,
सदस्य, महाराष्ट्र राज्य बॉयलर एक्झाम बोर्ड, मुंबई
माजी टेकनिकल ॲडव्हायझर,एसटीएम प्रोजेक्ट लि. नवी दिल्ली.
माजी वर्क्स मॅनेजर (बलसाड, प्रवरा, कोपरगाव)
कारखान्यातील मिल स्टॉपेजेस शून्यापर्यत नेण्यासाठी मा. आहेर सखोल मार्गदर्शन करतील.
संपर्क: मो.न.9958782982/ 9404804093. email – wrahergmail.com






