ऊस पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘ऑक्सफर्ड’च्या सहकार्याने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम

पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम ट्रस्टच्या साह्याने तेथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचा प्रारंभ २६ ऑक्टोबरपासून मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये झाला आहे.

दरम्यान, याआधी घोषित केलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाईब्ज प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात असून त्याचा प्रारंभ जानेवारीमध्ये बारामतीत होणाऱ्या कृषक प्रदर्शनात होत आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादनात गेम चेंजर ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबरोबर काम करणार आहे.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांची इंग्लंड दौऱ्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी भेट झाली होती. हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणारा परिणाम यासंदर्भात शिक्षण व संशोधनासाठी त्याच काळात ऑक्सफर्डला या क्षेत्रात भारतात कार्यरत संस्थेसमवेत काम करायचे होते.
ह्या भेटी दरम्यान प्रतापराव पवार यांनी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची माहिती डॉक्टर जावकर व त्यांच्या टीमला दिली. त्यानंतर संशोधनात्मक कामासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्याशी डॉ. जावकर यांची भेट घालून दिली.

ट्रस्टच्या कामाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर समक्ष त्यांनी येऊन सगळे कामकाज पाहिल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला.

सन २०२२ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात करार करताना सहा ठळक बाबींची यादी तयार केली होती. यात दुसऱ्या कमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य कराराचा उल्लेख होता.
या कराराअंतर्गत डॉ. जावकर व प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून मायकोसॉफ्ट व बिल गेटस् फांउडेशन यांच्या सहभागातून व बिल गेटस् यांच्या संकल्पनेतून वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलेन्स फार्म व्हाईब्ज याची निर्मिती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे करण्याची घोषणा ३ जानेवारी २०२३ रोजी मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केली होती.
१) सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाईब्ज

  • ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर आर्टीफिशीयल इन्टेलिजिन्स, मशिन लर्निंग, I0T, AR, VR, या सारख्या अत्याधुनिक
    तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करता येईल.
    • याचे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचे काम गेटस् फांउडेशन, मायकोसॉफ्ट, ऑक्सफर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
  • या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्यांच्या शेतात योग्य प्रमाणात खत, पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवता वाढवणे, सुयोग्य काढणी पश्चात तंत्रज्ञान, उत्पनाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पध्दतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज बांधणे, जमिनीची उत्पादकता वाढवणे, मातीची गुणवत्ता वाढवणे, रासायनिक खतांचा कमी वापर करणे यासांठी जमिनीलले सेन्सर, ड्रोन रोबॉट, सेटेलाईटद्वारे संपुर्ण प्रक्षेत्राचे नियोजन केले जाणार आहे.
  • है प्रात्यक्षिक प्रकल्प, ट्रस्ट मार्फत चेअरमन राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने दरवर्षी आयोजित करणेत येत असलेल्या कृषिक या कृषी प्रदर्शनामध्ये १८ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान पाहण्यासाठी खुले असणार आहे.

२) उस उत्पादनातील गेमचेन्जर

  • महाराष्ट्रातील ऊस हे महत्वाचे पीक आहे. या पिकासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगया वापर करून मातीच्या गुणवत्तेनुसार खत व पाणी व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत सेन्सर आणि उपग्रहाचा वापर करून ऊस उत्पादकाचा एकरी उत्पादनाच्या टनेजचा अंदाज बांधता येणार आहे.
  • साखर उताऱ्याचा अंदाज व तोडणीसाठी कालावधी निश्चित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यातून शेतक-याची उत्पादकता वाढेल पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल. जमिनीचा पोत सुधारेल, खताचा मर्यादित वापर झाल्याने त्याचा फायदा होईल. क्षारयुक्त जमिनीतूनही शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतील. साखर कारखान्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम साखर उताऱ्याशी निगडीत केल्याने या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील, अशी अपेक्षा आहे.
  • अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या विषयात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसमवेत काम करणार आहे.

३) ऑक्सफर्ड व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा जागतिक अभ्यासक्रम

  • पहिल्या वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऑनलाइन कोर्स २०२४ मध्ये नव्याने राबविला जाणारा असून यामध्ये मुख्यतः वातावरणातील बदल व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम यावर भर दिला जाणार आहे. ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाचे डॉक्टर अजित जावकर व डॉक्टर अलेक्झांडर मोलक है हया कोर्स करता ऑक्सफर्ड तर्फ प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
  • ट्रस्टमार्फत बारामती येथे स्थानिक एक्सपर्ट म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक निलेश नलावडे व डॉक्टर योगेश फाटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये ऑक्सफर्ड वि‌द्यापीठात आयोजित परिसंवादात देखील हे दोघे सहभागी होणार आहेत.
  • वातावरणातील बदलामुळे होणारे शेतकन्यांचे नुकसान टाळण्यासाठी आर्टिफिशीयल इंटलिजन्सचा कृषी क्षेत्रासाठी वापर करून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठीचा दृष्टीकोन नविन पिढीला मिळावा या उद्‌देशाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फॉर अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अॅड क्लायमेट चैज’ या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • ऑक्सफर्ड वि‌द्यापीठात शिक्षण घेत असणान्या शंभरहून अधिक देशातील वि‌द्याथ्यांची आवड व बारामतीतील संशोधन हे मु‌द्दे डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • या अभ्यासक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, डॉ. योगेश फाटके, सारंग नेरकर पुढील काळात ऑक्सफर्डचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्टये

  • नवनवीन आव्हाने व गरजा ओळखून अभ्यासक्रमाची निर्मिती
  • नोकरी बरोबरच नवसंशोधन व नवउद्योजक संधी
  • ऑनलाईन केस स्टडी प्रणालीवर शिक्षण
  • कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अभ्यासक्रम निश्चित
  • विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षणाची संधी
  • स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रोत्साहन
  • उ‌द्योग विश्वाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य व जानाची जोड
  • अधिकच्या रोजगाराच्या संधी

कोर्स कोणासाठी ?

  • कृषी, तंत्रज्ञान, हवामान बदल, अन्न साखळी क्षेशतील युवक आय. टी व संगणक क्षेत्रातील अभियांत्रिकी विद्यार्थी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी,मायकोसॉफ्टचे डॉ. चैतन्य बंडी, डॉ. रणवीर चंद्रा, डॉ. रॉबीन कोली, आयेशी मटलू, डॉ. रेनॅटो चुन्हा, डॉ. पियुष कुमार, लिओनारडो न्युन्स्, पिदर ओलसेन, रियाज पिषोरी, डॉ. स्वाती शर्मा, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर, फ्लोरीडा विद्यापीठाचे इशान कुमठेकर, वॉरिगंटनच्या नेल्सन फार्मसचे अॅन्डरू नेल्सन, प्रा. नीलेश नलावडे, डॉ. योगेश फाटके तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करतील.

शरद पवारांच्या दूरदृष्टीचे फलीत
तंत्रज्ञानाचा वापर कृषि क्षेत्रासाठी व्हावा, असा आग्रह ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांनी धरला होता. इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या उभारणीसह अनेक नवीन प्रकल्पात त्यांचे भरीव योगदान आहे. बारामती आणि ऑक्सफर्डचे नवीन नाते तयार होण्यात शरद पवार यांची भूमिका सर्वाधिक महत्वाची आहे. शरद पवार यांनी ऑक्सफर्डसोबत आता अभ्यासकम सुरू होणार असल्याचे समजल्यानंतर समाधान व्यक्त केले. भविष्यात याला व्यापक स्वरूप येणेसाठी बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन आर्टिफिशीयल इंटेलिजन्स प्रकल्प विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »