आजरा कारखान्यासाठी १७ डिसेंबरला मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार (दि. ६) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात १७ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या कारखान्याची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडलेली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर केली आहे. कारखान्याची अंतिम मतदारयादी २५ मे रोजी प्रसिद्ध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक साखर उपसंचालक कोल्हापूर गोपाळ मावळे यांची नियुक्त करण्यात आली आहे. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गडहिंग्लजचे सहायक निबंधक अमित गराडे, आजऱ्याचे सहायक निबंधक सुजय येझरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे…

निवडणूक कार्यक्रम असा
अर्ज भरणे ६ ते १० नोव्हेंबर :
● छाननी १६ नोव्हेंबर
माघार १ डिसेंबर
● चिन्ह वाटप ४ डिसेंबर
● मतदान १७ डिसेंबर
मतमोजणी १९ डिसेंबर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »