कसे आहेत साखर कारखानदार दादा!

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा कारखान्यावर निर्विवाद सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला – यावरून त्यांच्या नेटवर्कची ताकद स्पष्ट होते.
अजितदादांचे साखर उद्योग क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. या निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
बारामती, पुणे आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांतील अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखाने थेट किंवा अप्रत्यक्षपणे अजित पवार किंवा त्यांच्या नातेवाईक/समर्थकांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांच्या गटाने राज्यातील अनेक साखर कारखाने विकत घेतल्याची माहिती आहे.
प्रमुख कारखान्यांचे उदाहरण
- माळेगाव सहकारी साखर कारखाना
- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना
- सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
- छत्रपती सहकारी साखर कारखाना
- दौंड शुगर
- अंबालिका शुगर
- याशिवाय अजित पवार समूहाशी संबंधित/समर्थीत एकूण १०-१२ कारखान्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचे सांगितले जाते.
उसाचा गाळप: संख्यात्मक माहिती
साखर हंगामात (२०२१-२२) जरंडेश्वर कारखान्याने सुमारे १९.९८ लाख टन ऊस गाळप (crush) केले ज्यात राज्यातील सर्व कारखान्यात दुसरा क्रमांक आलाय. याच कारखान्याने २.२५ लाख टन साखर निर्मिती केली आणि ऊस उत्पादकांना सुमारे ५३१.७९ कोटी रुपये एफआरपी (Fair and Remunerative Price) दिले.
पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख कारखाने मिळूनच दरवर्षी १५ ते ३० लाख टनांपर्यंत ऊस गाळप करतात, असे अनुमान आहे. तर त्यांच्या नेतृत्वाला मानणाऱ्या साखर कारखान्यांची एकंदरित गाळप क्षमता प्रति दिन सुमारे ५५ ते ६५ हजार टन आहे आणि हे सारे साखर कारखाने सरासरी प्रति हंगाम सुमारे ६५ ते ७० लाख टन ऊस गाळप करतात, असे सांगितले जाते.
कृषीक्षेत्रातील योगदान
अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत:
- कृषी वाढ दर (२०२३-२४): ३.३% वरून थेट ८.७% पर्यंत वाढ. हे आर्थिक मदतीमुळे आणि शेतकऱ्यांना स्थिर आर्थिक पाठबळ दिल्यामुळे शक्य झाले आहे.
- एआय (Artificial Intelligence) वापर, जलयुक्त शिवार, ‘वन तालुका वन मार्केट’, नदीजोड प्रकल्प, बाम्बू लागवड, सिंचन प्रकल्प, आणि ग्रिड-प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा यासारखे उपक्रम सुरू केले आहेत.
निष्कर्ष
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी व सहकार चळवळीने महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या गटाचे जवळपास १५-२० मोठे साखर कारखाने त्यांच्या नियंत्रणाखाली असून, यांमधून लाखो टन उसाचे प्रतिवर्षी गाळप केले जाते. त्यांनी कृषीमध्ये शाश्वत वाढ, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.

राजकीय कारकीर्द
परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख “अजित दादा’ म्हणूनच आहे. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर ज्येष्ठ नेते शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले, अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत.
खा. शरद पवार भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख करतात. तर याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित दादांचे आयुष्य सुरूवातीला अत्यंत सामान्य आणि हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्य, अडचणी यांची पुरेपुर जाण अजित पवार यांना आहे.
अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले.
या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्या बरोबरच त्यांनी एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्पावधीत सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी आपला प्रभाव वाढवला. अजितदादांनी २०१४ पर्यंत राज्यात विविध खाती सांभाळली. प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
पक्ष कार्यकर्त्यांना त्यांची कारभाराची कार्यक्षम शैली आकर्षित करते. पाच वेळा बारामतीचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. राज्यातून २०१४ नंतर पक्षाची सत्ता गेल्यानंतर अजितदादा स्वस्थ बसलेले नव्हते. ‘राजकीय जीवनात चढउतार होत असतात. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचे नाही,’ असा त्यांचा कार्यकर्त्यांना सांगावा असे. सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला आहे.
शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यात आणि सुप्रिया सुळेंमध्ये स्पर्धा असली तरी अजित पवार ते दाखवून देत नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली होती. दारूबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, आधुनिक शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांना प्रोत्साहन, नगर-विकास, पंचायत राज व्यवस्थेत सर्व घटकांना सामावून घेणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाची मांडणी करणं या सगळ्यांत अजित पवारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे.
सध्या राज्यात कोरोनाचं संकट असताना अजित पवारांनी पायाला भिंगरी लावून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना कायम हुलकावणीच दिली आहे. तगडी खाती पदरात पाडून घेताना राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षं उपमुख्यमंत्रीपदच आपल्या वाट्याला घेतलं. सध्याच्या सत्ता-संघर्षात राष्ट्रवादीने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवलीय एवढं मात्र नक्की.
उद्धव ठाकरे सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी श्री. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये जुलै २०२३ मध्ये सामील होऊन अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. ५ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी. अजित पवार उर्फ दादा यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा..!!