*माळेगाव*च्या अध्यक्षपदाची माळ अखेर अजितदादांच्या गळ्यात

पुणे : जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर घवघवीत यश मिळवले. कारखाना निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणच चेअरमन होणार असल्याचे जाहीर केले होते. तर व्हा. चेअरमनपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी (दि.५) रोजी चेअरमन व व्हाचेअरमन पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तहसीलदार गणेश शिंदे यांनी सहायक म्हणून काम पाहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चेअरमनपदासाठी व महिला संचालक संगिता कोकरे यांची व्हाचेअरमनपदासाठी दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे माजी चेअरमन केशवराव जगताप, माजी व्हा. चेअरमन राजेंद्र ढवाण, कार्यकारी संचालक अशोक पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, नवनिर्वाचित संचालक शिवराजराजे जाधवराव, योगेश जगताप, तानाजी कोकरे, राजेंद्र बुरुंगले, स्वप्निल जगताप, अविनाश देवकाते, प्रताप आटोळे, नितीन शेंडे, रत्नकुमार भोसले, जयपाल देवकाते, चंद्रराव तावरे, नितीन सातव यांच्यासह आजी माजी संचालक, शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.