अवघ्या १०२ मतांसाठी अजित दादांचा आटापिटा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चंद्रकांत भुजबळ

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांची संख्या जरी १९ हजार ५४९ असली तरी उपमुख्यमंत्री ज्या मतदारसंघ गटातून निवडणूक लढवित आहेत त्या गटातील मतदारांची संख्या केवळ १०२ आहे.

आता निवडणूक जिंकण्यासाठी या १०२ मतदारांवर मदार असून या मतांसाठी आटापिटा करावा लागत आहे. ब वर्ग संस्था मतदार संघ या गटातील १०२ मतदार आहेत ते संबंधित संस्थेने प्राधिकृत केलेले प्रतिनिधि असतात त्यांना मतदान करण्याचा हक्क दिलेला असतो.

आता त्या संस्थेचा प्राधिकृत व्यक्ति शक्यतो चेअरमनच असतात या मतदारांची मात्र चांदी आहे. रात्रीची बँक उघडली या आरोपवरुन किती भाव फुटला असेल याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या चर्चाना उधाण आले आहे. १९ हजार ५४९ मतदारांसाठी विभागून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र सुविधा केल्या असून ब वर्ग संस्था मतदार संघ या गटातील १०२ मतदारांसाठी प्रशासकीय भवन हे एकमेव केंद्र निर्धारित केलेले आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण ६ गटांतून (‘अ’वर्ग) १९ हजार ५४९, तर ‘ब’वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कारखाना कार्यक्षेत्रातील गट, गटामधील गावे व मतदार पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक १ : माळेगाव (२९६५)
गावे : माळेगाव बुद्रुक (१७६७), माळेगाव खुर्द (५८०), येळेगाव (१९४), पाहुणेवाडी (१४०), ढाकाळे (२८४).


गट क्रमांक २ पणदरे (३७९६)
गावे : पणदरे (२२८६), मानाप्पाचीवाडी (२७८), पवईमाळ (२१५), सोनकसवाडी (३५१), कुरणेवाडी (१४९), धुमाळवाडी (२८८), खामगळवाडी (२२९).


गट क्रमांक ३ : सांगवी (२४८७)
गावे: सांगवी (१३३६), कांबळेश्वर (७००), शिरने (२८२), पांढरेवाडी (११९), पिंगळेवाडी (५०).


गट क्रमांक ४ : खांडज-शिरवली (२३७९)
गावे : खांडज (१४७७), शिरवली (९०२). गट क्रमांक ५: निरावागज (३५०६) -गावे निरावागज (१८५३), मेखळी (१२७३), सोनगाव (२४१), घाडगेवाडी (१३९).


गट क्रमांक ६ : बारामती (४४१६)
गावे : बारामती (७०३), मळद (६९१), मेडद (६०५), गुणवडी (४४७), डोरलेवाडी (२३३), राजाळे-सांगवी (१), वीरपुरी-दहिगाव (१), कहऱ्हावागज (५६१), नेपतवळण (२८८), बऱ्हाणपूर (१२०), उंडवडी सुपे (१८२), उंडवडी क. प. (१४७), जराडवाडी (२८६), सोनवडी (१५१).

आणि
‘ब’ वर्गातून १०२ सभासद.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »