अजित पवार यांची निवड बेकायदेशीर : तावरे
पुणे : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड होताना, त्यांच्या नावास संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने २०२२ साली दिलेल्या निर्णयानुसार ‘ब’ वर्गातून निवडुन आलेल्या उमेदवारांना कोणत्याही संस्थेचे चेअरमन होता येत नाही. या निर्णयानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप कारखान्याचे जेष्ठ संचालक चंद्रराव तावरे व माजी अध्यक्ष रंजन तावरे या गुरु शिष्यांची जोडीने पत्रकार परिषदेत केला आहे. चंद्रराव तावरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांना अर्जाद्वारे हरकत घेतली. यावेळी तावरे म्हणाले की, चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज छाननीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्जावर हरकत घेऊन २०२२ साली औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ जोडला होता. कोणत्याही संस्थेत ब वगार्तुन निवडुन आलेला उमेदवार चेअरमन होऊ शकत नाही असा ७३ (ड) कलमाद्वारे निर्णय दिला आहे. निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने ही निवड प्रक्रिया रेटुन नेली आहे.