लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, ऑगस्ट ३१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ९, शके १९४७
सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५४
चंद्रोदय : १३:०४ चंद्रास्त : ००:०५, सप्टेंबर ०१
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ००:५७, सप्टेंबर ०१ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – १७:२७ पर्यंत
योग : वैधृति – १५:५९ पर्यंत
करण : विष्टि – ११:५४ पर्यंत
द्वितीय करण : बव – ००:५७, सप्टेंबर ०१ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १७:२० ते १८:५४
गुलिक काल : १५:४६ ते १७:२०
यमगण्ड : १२:३९ ते १४:१२
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०४
दुर्मुहूर्त : १७:१४ ते १८:०४
वर्ज्य : २३:३७ ते ०१:२३, सप्टेंबर ०१

लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली

आज तेज, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गौरींचे आगमन आहे.

२०२० : भारतरत्न पुरस्कार सन्मानित , भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणव मुखर्जी यांचे निधन ( जन्म : ११ डिसेंबर, १९३५ )

आज बालस्वातंत्रदिन आहे.

लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम – आधुनिक कालखंडातील एक ख्यातनाम पंजाबी कवयित्री. गुजाराणवाला (पाकिस्तान) येथे जन्म. त्यांचे मूळ नाव अमृतकौर असून पतीचे नाव प्रीतम सिंह कातवाडा आहे. फाळणीची झळ बसून त्यांना लाहोर सोडून दिल्लीस यावे लागले. दिल्ली येथे आकाशवाणीवर त्यांनी १९४८ ते १९६० पर्यंत ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून नोकरी केली. ह्या काळात त्यांनी आकाशवाणीसाठी गीत, रूपक इ. स्वरूपाचे लेखन केलेले आहे. त्यांचे वडील कर्तार सिंह हितकारी हे कवी होते. त्यांच्या काव्याचा प्रभाव पडून वयाच्या सोळाव्या वर्षापासून अमृता प्रीतम यांनी काव्यरचनेस आरंभ केला.

सुरुवातीची त्यांची रचना पारंपरिक होती. तथापि लौकरच स्वतःच्या प्रगाढ अनुभूतीमुळे व वैयक्तिक भावना व्यक्त करण्याच्या उत्कट इच्छेमुळे त्यांच्या काव्यात एक परिवर्तन घडून आले. स्त्रियांची बाजू त्या हिरिरीने मांडू लागल्या. स्त्रीजातीवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व पारंपरिक मूल्यांविरुद्ध बंड पुकारले.

आतापर्यंत त्यांचे बारा-तेरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. में त्वारिख हाँ हिंद दी ! या दीर्घ काव्यात त्यांनी फाळणीची दारुण व्यथा व्यक्त केली आहे. सरघी वेला (१९५१) ह्या संग्रहात मानवी मनातील अत्यंत तरल आणि कोमल भावभावना कलात्मक रीत्या व्यक्त करण्यात आल्या असून, त्यांनी ह्या संग्रहात उच्च कलात्मक पातळी गाठली आहे. त्यांच्या काव्यातील ओज हा गुण वास्तव परिस्थिती तसेच सर्व प्रकारची दडपशाही व बंधने ह्यांविरुद्ध बंड करण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छेमधून आलेला आहे. जिथे त्यांचे अनुभव व सर्वसामान्य जनतेचे अनुभव एकसारखे असतात, अशा विषयांवरील त्यांचे लिखाण सरस उतरले आहे. प्रेम हा त्यांच्या काव्याचा केंद्रबिंदू आहे मग हे प्रेम आत्मनिष्ठ असो की मानवजातीचे असो.

त्यांच्या साहित्यात एका कलाकाराच्या विकासाचा आलेख स्पष्ट दिसून येतो. सुरुवातीला स्वतःच्या भावनांविषयी त्यांनी लिहिले, नंतर मातृभूमीविषयीच्या भावनांचा आविष्कार त्यांच्या साहित्यात झाला व शेवटी अखिल मानवजातीच्या भावनांचे पडसाद त्यांच्या साहित्यात उमटले. त्यांची शैली सुबोध परंतु औपरोधिक आहे. ‘अज आखाँ वारिस शाह नूँ’ या त्यांच्या कवितेने तर त्यांना पंजाबी साहित्यात अजरामर बनविले.

बदलां दे पले विच (१९४३), लंबियां वाटां (१९४९), मौली ते महंदी (१९५५), सरघी वेला (१९५१), अशोक छेती (१९५७) व चानंन दा हौका (१९६२) हे त्यांचे उल्लेखनीय प्रकाशित काव्यसंग्रह व डॉ. देव (१९४९), जय श्री (१९४६), पिंजर (१९५०), आलना (१९५२) ह्या कादंबऱ्या. यांव्यतिरिक्त त्यांनी पंजाबी साहित्य दा इतिहास हा साहित्येतिहास-ग्रंथही लिहिला आहे.

त्यांच्या साहित्यावर कलम दा भेत व अमृता प्रीतम दी चौनवी कविता हे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही साहित्यकृतींची हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती व उर्दू या भाषांत भाषांतरे झाली आहेत. अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटिने त्यांच्या साहित्यावर Mahfil नावाचा एक खास ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. साहित्य अकादेमीने १९५६ मध्ये आणि पंजाब सरकारने १९५८ मध्ये त्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे. दिल्ली येथून निघणाऱ्या नागमणी ह्या पंजाबी मासिकाच्या त्या सध्या संपादक असून साहित्य अकादेमीच्या सदस्यही आहेत. रशिया, बल्गेरिया, हंगेरी, जर्मनी इ. यूरोपिय देशांचा त्यांनी प्रवास केला.

१९१९: कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५)

मृत्युंजय कादंबरी : शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

मूळचे कोल्हापूर जवळील आजरा गावातील. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.

पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या “बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे” ते संमेलनाध्यक्ष होते.
मृत्युंजय या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे
मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.

२००२ : साहित्यकार शिवाजी सावंत यांचे निधन ( जन्म : ३१ ऑगस्ट, १९४० )

  • घटना :
    १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
    १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.
    १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
    १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
    १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
    १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
    १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
    १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
    १९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.

• मृत्यू :
१९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२
• १९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या. (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)
• २०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)

  • जन्म :
    १९०२: रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म.
    १९३१: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २००५)
    १९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)
    १९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.
    १९६९: जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म.
    १९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »