शाहीर अनंत फंदी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, नोव्हेंबर ३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १२, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : ०८:०४ चंद्रास्त : १९:१३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – २२:०५ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : सौभाग्य – ११:४० पर्यंत
करण : बालव – ०९:१६ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २२:०५ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १६:३८ ते १८:०४
गुलिक काल : १५:१३ ते १६:३८
यमगण्ड : १२:२२ ते १३:४७
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : १६:३३ ते १७:१८
अमृत काल : २०:४५ ते २२:३०
वर्ज्य : १०:१९ ते १२:०४

|| सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ||
भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.

कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे.
या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे.

“आज यम द्वितीया आहे.

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी होउनि बोज आपुला दवडुं नको
स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.

उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप.
अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले’ अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.

• १८१९: शाहीर अनंत फंदी यांचे निधन.

संगीतकार लक्ष्मीकांत – यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरं तर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभूत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लतादीदींना साथ केली. त्या वेळी या छोट्या मुलाची कर्तबगारी आणि वादनातील कौशल्य याने लतादीदी भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले.
लतादीदींनी लक्ष्मीकांतजींना ‘सुरील कला केंद्र’ या लहान मुलांना संगीतशिक्षण देणाऱ्या संस्थेत पाठवले. तिथेच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. त्यांचे वडील मशहूर ट्रंपेटवादक असले तरी का कोण जाणे, त्यांनी या कलेचा वारसा प्यारेलालजींना दिला नाही. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. प्यारेलालजी व्हायोलीन वाजवायला शिकले. लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी होते आणि लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकरच्या ऐवजी ‘गोडबोले’ शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं.
गरिबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमिनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते इमानदार राहिले. एक यशस्वी व्यावसायिक ज्या व्यावसायिक क्लृप्त्या वापरतो त्या सर्व त्यांनी बेधडकपणे वापरल्या. लक्ष्मीकांतजी बोलघेवडे, तर प्यारेलालजी मितभाषी. यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत.

आलेलं कुठलंही काम – मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजिकल – नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं.

१९६३च्या ‘पारसमणी’च्या आठ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं; पण तो चित्रपट फारसा चालला नाही १९४८च्या ‘जिद्दी’पासून १९६३पर्यंत या दोघांनी त्या काळातल्या फक्त ओ. पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. ‘दोस्ती’ चित्रपटासाठी ‘एलपी’ना त्यांचा पहिलावहिला फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला, ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सूट शिवून घेतला होता. मैत्रीची, स्नेहाची ही अशी उदाहरणे लक्ष्मीकांतजींच्या आयुष्यात जागोजागी सापडतील. आणि अर्थात हा ‘गिव्ह अँड टेक’ मामला असल्याने ‘एलपी’नी ही केलेल्या सहकार्याचीही उदाहरणे मिळतील. आपल्या जुन्या वादक सहकाऱ्यांना फ्री-लान्सिंगच्या जमान्यातही टिकवून ठेवणे त्यांना बरोबर जमत असे. लाला पाठारी आणि अब्दुल करीम हे दोघे ढोलकपटू म्हणजे ‘एलपीं’च्या संगीताचा ट्रेडमार्क.

पं. हरिप्रसाद चौरसिया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्तीदेखील अशीच स्ट्रगलिंगच्या काळातली आणि अखेरपर्यंत टिकलेली होती. आजही ‘हिरो’मधली ती बासरी, ‘कर्ज’मधली गिटारची धून, ‘दोस्ती’मधले माउथ ऑर्गनचे पीस कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. या इंडस्ट्रीत आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी ६३५ चित्रपटांना, ३५००हून अधिक गाण्यांना त्यांनी संगीत दिले आणि व सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे , १९९८)

  • घटना :
    १८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
    १८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.
    १९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
    १९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
    १९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.
    १९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
    १९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
    १९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
    १९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
    १९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
    २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.

• मृत्यू :
• १९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी , १९२२)
• १९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर, १९२६)
• १९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी, १९२०)
• २०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.
• २०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर, १९२३)

  • जन्म :
    १६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर, १७४३)
    १९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे, १९७१)
    १९१३ : वयाच्या १९ व्या वर्षी फाशीला सामोरे जाणारे तरुण युवा क्रांतिकारक प्रद्योत कुमार भट्टाचार्य यांचा जन्म ( बलिदान : १२ जानेवारी, १९३३ )
    १९१७: भारतीय स्वतंत्रता सेनानी अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
    १९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू : २३ जून , २००५ )
    १९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »