कोयता बंद आणि ‘आंदोलन अंकुश’चा व्हायरल व्हिडिओ

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी तोडणीपूर्वी ऊस दर जाहीर करावेत, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. कोयता बंद, गाळप बंद पाडणे, जाब विचारणे असे आंदोलनाचे स्वरूप आहे. पंचगंगा कारखान्याच्या हद्दीत आंदोलन करून, जाब विचारताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.