अण्वस्त्रविरोधी दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, ऑगस्ट ६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १५, शके १९४७
सूर्योदय : ०६:१७ सूर्यास्त : १९:१२
चंद्रोदय : १७:०३ चंद्रास्त : ०४:०५, ऑगस्ट ०७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – १४:०८ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १३:०० पर्यंत
योग : वैधृति – ०७:१८ पर्यंत
करण : बालव – १४:०८ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:२२, ऑगस्ट ०७ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १२:४४ ते १४:२१
गुलिक काल : ११:०७ ते १२:४४
यमगण्ड : ०७:५४ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१८ ते १३:१०
वर्ज्य : ११:१७ ते १३:००
वर्ज्य : २३:०० ते ००:४०, ऑगस्ट ०७

आज जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन / अणुशस्त्र जागृती दिन आहे.

हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौरस मैल एवढा भाग नष्ट पावला. या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.
त्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
१९४५ : जपानमधील हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला गेला.

राष्ट्र गुरु सुरेन्द्रनाथ बॅनर्जी – यांनी पैरेन्टल ऐकेडेमिक इंस्टीट्यूशन आणि हिन्दू कॉलेज मधून शिक्षण घेतले तसेच १८६६ मध्ये भारतीय सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्यासाठी इंग्लडला जाऊन आले.

१८६९ मध्ये वयाची अट दाखवून स्पर्धात्मक परीक्षेत अडथळा आला पण नंतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सिलहट मध्ये सहायक मजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली. पण पुढे भेदभाव झाल्याने त्यांची नियुक्ती रद्द झाली. ह्या विरोधात इंग्लडला जाऊन आले पर त्यांचे प्रयत्न असफल झाले, मात्र १८७४ – ७५ मध्ये इंग्लडला असताना एडमंड बर्क तसेच इतर तत्वज्ञानाचे अध्ययन केले.

जून, १८७५ मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूशन (विद्यमान विद्यासागर महाविद्यालय), फ्री चर्च इंस्टीट्यूशन व रिपन कॉलेज (विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय) मध्ये प्राध्यापक म्हणूंन काम पहिले. राष्ट्रवादी व उदार राजनीती तसेच इतिहास विषयावर भाषण व जनजागृती करण्यास सुरवात केली. २६ जुलै, १८७६ मध्ये आनन्दमोहन बोस यांचे बरोबर भारतीय राष्ट्रीय समितिची / संघटनेची स्थापना केली. १८७९ मध्ये द बंगाली ह्या समाचार पत्राची सुरवात केली. १८८३ मध्ये झालेल्या लिखाणामुळे त्यांना पकडण्यात आले मात्र त्याचे पडसाद आग्रा, फ़ैजाबाद, अमृतसर , लाहोर, पुणे तसेच बंगाल मध्ये हरताळ करण्यात आला.

१८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मध्ये स्वतः:ला तसेच स्वतः: संघटनेचे विलीनीकरण केले. १८९५ मध्ये पुणे तर १९०२ मध्ये अहमदाबाद येथे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवले.

१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीला जाहीर विरोध करणारे ते प्रमुख नेते होते. देशभरातून झालेल्या विरोधामुळे १९१२ मध्ये इंग्रजांना बंगाल फाळणीचे प्रस्ताव मागे घ्यावे लागले.
तसेच सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी स्वदेशीचा पुरस्कार व परदेशी मालावर बहिष्कारासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना “बंगाल के बेताज राजा” संबोधले.

१९२१ मध्ये ते बंगालच्या विधान परिषदेवर निवडण्यात आले तसेच १९२१ ते १९२४ कालावधीत स्थानिय स्वशासनातही मंत्री स्वरूपात काम केले.

ब्रिटिशांनी त्यांचा सन्मान करताना “सरेन्डर नॉट” असे उद्बोधित केले.

१९२५ : राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राष्ट्र गुरु सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन ( जन्म : १० नोव्हेंबर, १८४८ )

२०१९ : मानवी तस्करीला बळी पडलेल्या अनेकांसाठी सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री म्हणून तारणहार ठरल्या.

अनेकांनी केवळ ट्विट संदेशांद्वारे सुषमा यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रालयामार्फत मार्गदर्शन, कौशल्य शिक्षण यांची कवाडे स्वराज यांनी खुली केली. भारतीय महिलांशी विवाह करून नंतर त्यांना येथेच सोडून परदेशी जाणारे अनिवासी भारतीय वा नवविवाहित पत्नींना परदेशी नेऊन त्यांचा छळ करून त्यांना सोडून देणारे पुरुष यांच्या भारतातील मालमत्ता जप्त करण्यासाठी स्वराज यांनी झटून कायदा करवून घेतला. अशांना नोटीस बजावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर मायक्रोसाइट बनवून त्यांना दिलासा दिला.

२०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित सुषमा स्वराज यांचे निधन ( जन्म : १४ फेब्रुवारी, १९५२)

  • घटना :
    १९१४ : सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
    १९२६ : हॅरी हुडिनीने पाण्याखाली सीलबंद पेटित ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
    १९६० : अमेरिकेने घातलेल्या व्यापार बंदीला प्रत्युत्तर म्हणीन क्युबाने अमेरिकन बँकेसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयकरण केले.
    १९६२ : जमैकाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १९९० : कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
    १९९७ : श्रीलंका क्रिकेट संघाने कोलंबो येथे भारताविरुद्दच्या सामन्यात ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली तर त्यानं सनथ जयसूर्याचा ३४० धावांचा वाटा होता.
    १९९७ : कोरियन airlines चे ८०१ बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमान तळावर कोसळून झालेल्या अपघातात २२८ जण मृत्युमुखी पडले.
    २०१० : जम्मू – काश्मीर मध्ये भयानक पूर आला.

• मृत्यू :

••१९६५ : संगीतकार वसंत पवार यांचे निधन.
•१९९७ : ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार सन्मानित आसामी साहित्यिक वीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन ( जन्म : १ अप्रैल, १९२४ )
•१९९९ : केंद्रीय मंत्री, राज्यसभा ( ३ वेळा ) व लोकसभा ( ४ वेळा ) खासदार , काँग्रेस नेते कल्पनाथ राय यांचे निधन ( जन्म : ४ जानेवारी, १९४१ )
•२००१ : नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी यांचे निधन (जन्म : ४ मार्च, १९१४ )

  • जन्म :

१९२५ : लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ( मृत्यू : १ नोव्हेंबर, २००५ )
१९५९ : रैमन मैगसेसे पुरस्कार सन्मानित भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म
१९६५ : चित्रपट दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा जन्म

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »