डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, जुलै २७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ५, शके १९४७
सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय : ०८:२५ चंद्रास्त : २१:१६
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – २२:४१ पर्यंत
नक्षत्र : मघा – १६:२३ पर्यंत
योग : वरीयान् – ०३:१३, जुलै २८ पर्यंत
करण : तैतिल – १०:३६ पर्यंत
द्वितीय करण : गर – २२:४१ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १७:३८ ते १९:१६
गुलिक काल : १६:०१ ते १७:३८
यमगण्ड : १२:४५ ते १४:२३
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : १७:३२ ते १८:२४
अमृत काल : १३:५६ ते १५:३४
वर्ज्य : ००:४७, जुलै २८ ते ०२:२८, जुलै २८

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, व विज्ञानाचे परम भोक्ता असणारे, देशाला संरक्षण विषयात स्वयंसिद्ध करणारे, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

२०१५ : भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे . अब्दुल कलाम यांचे निधन ( जन्म : १५ ऑक्टोबर, १९३१ )

संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेजमधून पीएचडी (१९३६) व डीएस्सी (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारं शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडलं. (त्याचबरोबर जागतिक भूक, अपुरा आहार, कुपोषण यांच्या जोडीनं विशेषत: सेवानिवृत्तीनंतर गरीबांसाठी पोषक आहाराकरिता ‘इंदिरा कम्युनिटी किचन’, खेड्यातली स्वच्छता यांसारखे प्रकल्प राबवले.) त्यासाठी लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सर्वेक्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडं आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

भारतात परतल्यावर ‘अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य’ या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली.

पुढं दिल्लीच्या ‘भारतीय कृषीसंशोधन मंडळात’ (आयसीएआर) संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणी व जीवमितीशास्त्र या दोन्हींत बारकाईनं लक्ष घातलं. त्या आधारे उत्तर प्रदेशातल्या इटाह इथं ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या प्रमुखत्वाखाली चाललेला शेळीच्या दुधाचा, तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प, वार्षिक संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचा सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणं अधिकाऱ्यांना जड गेलं. पण त्यातून सावरल्यावर ह्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या मंडळींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांवर टाकली. (ह्या प्रशिक्षण कार्यक्रमास बळकटी यावी म्हणून ‘स्टॅटिस्टिकल मेथड्स् फॉर अॅग्रिकल्चरल रिसर्च’ हे कृषी विद्यापीठं व महाविद्यालयातून लोकप्रिय ठरलेलं व पुढं ज्याची स्पॅनिश आवृत्ती निघाली, ते पुस्तक सुखात्मे यांनी लिहिलं.)

डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीर्ती युनोच्या ‘एफएओ’पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळे त्या संघटनेनं सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं. १९४८पासून ते ‘एफएओ’चं संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम इथं रुजू झाले.

डॉ. सुखात्मे यांच्या विशेष कामात, मुंबई विद्यापीठात, संख्याशास्त्र विभाग काढण्यात (१९४८) त्यांनी पुढाकार घेतला व इकडच्या तरुणांना संख्याशास्त्रीय नोकऱ्यांची दार खुली करून दिली याचा उल्लेख अनिवार्य आहे.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता. त्यासाठी पुण्याच्या मंडईत ‘इंदिरा कम्युनिटी किचन’ हा अत्यंत अभिनव व पथदर्शक कार्यक्रम राबवून त्यात दुर्बल घटकांना रोजगार व गरीबांना आपण घरी रोज जे अन्न खातो तो प्रथिनयुक्त आहार २० ते २५ टक्के इतक्या स्वस्त दरानं पुरवला.

खेडी व झोपडपट्ट्यांतली रोगराई निपटून काढण्यासाठी स्वच्छता व आरोग्य याकडं लक्ष देऊन त्यांचं जीवनमान पालटण्यासाठी सुखात्मे यांनी पुण्याजवळ किरकटवाडी इथं १९७९ साली, शाळेजवळील कचऱ्याचे ढीग हलवून मुलांना होणाऱ्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त केला. गावात संडास व मुताऱ्या बांधून देऊन खेडूतांना उघड्यावर घाण करण्यातले धोके समजावले. विहिरीत क्लोरीन टाकून पिण्याचा स्वच्छ पाण्याची सोय केली. त्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले.
१९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ह्या पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला.

१९११ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संख्या शास्त्रज्ञ् डॉ. पा. वा. सुखात्मे यांचा जन्म ( मृत्यू : २८ जानेवारी, १९९७)

  • घटना :
    १७६१ : माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे झाले.
    १८६६ : आयर्लन्डच्या व्हॅलेन्सीया व्दिपापासून कॅनडातील ट्रिनिटी बे पर्यंत समुद्राखालील तर घालण्याचे काम पूर्ण. त्यामुळे तर संदेश वाहन पाठवणे सुरु झाले.
    १९२१ : टोरांटो विद्यापीठात सर फेड्रिक बॅटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना इन्शुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश आले.
    २७ जुलै १९३९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना मध्यप्रदेश मध्ये निमच येथे स्थापित झाली. त्याकाळी बरेच संस्थाने होती त्यांचे स्वतंत्र राखीव दले होती यासगळ्यांवर वचक बसवत एकछत्री अंमल बसावा म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका होती
    १९४९ : पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हविललँड कॉमेंटचे पहिले उड्डाण
    २०१५ : १९९३ सालच्या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी याकूब मेमनला त्याच्या ५४ व्या वाढदिवशीच २२ वर्षांनी नागपूर कारागृहात सकाळी सात वाजता फाशी देण्यात आली.

• मृत्यू :

१८९५ : किराणा घराण्याचे प्रवर्तक, रुद्र वीणाचे मधुर वादक, उस्ताद बंदे अली खॉं बिनाकार यांचे निधन.
१९७५ : गांधीवादी नेते, खासदार, तसेच भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करणारे मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन
१९८७ : पदमविभूषण सन्मानित भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ सलीम अली यांचे निधन ( जन्म : १२ नोव्हेंबर, १८९६ )
१९९२ : हिंदी चित्रपट अभिनेते – खलनायक अमजद खान यांचे निधन ( जन्म : १२ नोव्हेंबर, १९४०, गझनी, अफ़गाणिस्तान )
१९९७ : हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन
२००२ : भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन ( जन्म : २८ फेब्रुवारी, १९२७ )
२००७ : स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन ( जन्म : ३० जानेवारी, १९१७ )

  • जन्म:
    १९०७ : महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक वामनराव हरी देशपांडे यांचा जन्म ( मृत्यू : ७ फेब्रुवारी १९९०)
    १९५४ : भारतीय वकील व राजकारणी जी. एस. बाली यांचा जन्म
    १९६७ : भारतीय अभिनेते, लेखक, व दिग्दर्शक राहुल बोस यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »