अरुणा असफ अली

आज बुधवार, जुलै १६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २५, शके १९४७
सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : २३:१९ चंद्रास्त : ११:०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – २१:०१ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – ०४:५०, जुलै १७ पर्यंत
योग : शोभन – ११:५७ पर्यंत
करण : गर – ०९:५२ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २१:०१ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन – १७:४० पर्यंत
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १२:४५ ते १४:२३
गुलिक काल : ११:०६ ते १२:४५
यमगण्ड०७:४८ ते ०९:२७
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१८ ते १३:११
अमृत काल : ००:१३, जुलै १७ ते ०१:४६, जुलै १७
वर्ज्य : १५:०० ते १६:३२
श्रीपंतांनी म्हटल्याप्रमाणे
‘वेणुनगरीं ब्रह्मज्ञानाचें कोठार । उघडुनियां थोर ख्याति केली ॥
श्रीशैल्य यात्रेचें करूनिया मीस । दत्तह्र्दयी वास गुप्त केला ॥’
बालमुकुंद भक्तोद्धारक। नमितो मी तुजला ।।
सत्यवचन तू सत्यप्रतिज्ञ। परमहंस भला ।।
दूर म्हणो तरी जवळी अससी । ह्दयी प्रेमा भरला।।
आशीर्वाद धन्य तुझा हा । दत्तस्वरुपी रमला।।
आज श्री श्री बालमुकुंद अथवा बालावधूत यांचा निजानंदगमन दिन आहे. (निजानंदगमन – आषाढ व.६, शके १८७९, दि. १९-०७-१९५७ – जन्म – भाद्रपद शुद्ध १, शके १८२९, दि. ८-०९-१९०७ )
अरुणा असफअलीं- सन १९४२ मध्ये महात्मा गांधींनी गोवालिया टंक मैदानावरून ब्रिटीश साम्राज्यशाही विरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा पुकार करताच, अवती भवती असलेल्या पोलिसांची पर्वा न करता हाती तिरंगा घेऊन ‘भारत छोडो’ च्या गगनभेदी गर्जना करणाऱ्या व आपलं पुढ्चं सर्व आयुष्य देशासाठी खर्च करणाऱ्या अरुणा असफअलींचा जन्म बंगालमधील काल्का या गावी एका कर्मठ कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव अरुणा गांगुली. त्या स्वतंत्रपणे विचार करण्याऱ्या होत्या.
डोळ्यांवर झापडं लाऊन पारंपरिक मार्गाने वाटचाल करणं हे त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी आई वडिलांच्या इच्छ्येच्या विरुद्ध प्रथम लाहोरच्या ख्रीस्ती मिशनरी शाळेत व नंतर नैनितालच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. देशासाठी काहीतरी करावं या उत्कट इच्छेनं अरुनांनी गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत वयाच्या १८ व्या वर्षी उडी घेतली. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या असफअली यांच्याशी त्यांची ओळख होऊन पुढे त्यांचा विवाह झाला.पती आपल्याच विचारांचा लाभल्याने त्या राजकारणात हिरीरीने भाग घेऊ लागल्या.
१९३० ते १९४१ या कालखंडात अटक, कारावास व सुटका या गोष्टी सतत चालू होत्या.
‘नुसते तुरंग भरून स्वातंत्र्य मिळेल’ ही गोष्ट पटेनासी झाल्याने १९४२ मध्ये म. गांधीजी इंग्रजांना ‘भारत छोडो’ हा इशारा दिल्यानंतर, पकडायल्या आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्या चार वर्ष भूमिगत राहिल्या.
१९४६ साली त्यांच्यावरचे पकड वॉरंट रद्ध होताच त्या प्रकट झाल्या. स्वातंत्र्यरोत्तर काळात १९४८ साली मध्ये त्या युनेस्कोच्या मेक्सिको येथील परिषदेत डॉ. रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून गेल्या.
१९५६ मध्ये त्या दिल्लीच्या त्या महापौर झाल्या. त्यांना ‘सोविएतल्यंड नेहरू पुरस्कार’, लेनिन पुरस्कार , इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबदल ‘नेहरू पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले. तसेच १९९७ मध्ये भारत सरकारने ‘ भारत रत्न ‘ ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
जनरल के.व्ही. कृष्णराव – हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांच्याच पुढाकाराने १९८० च्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.
९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेश, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर तैनात होते.
१९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानविरोधातील युद्धातही त्यांनी भाग घेतला. देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराविरुद्ध त्यांनी कारवाई केली.
१९६५-६६ या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर १९६९-७० या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले.
१९७०-७२ या काळात नागालॅंड व मणिपूरमधील घुसखोरीविरुद्ध कारवाया करणाऱ्या पहाडी तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. याच काळात १९७१ च्या बांगलादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांगलादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषवले तसेच त्यांना परमविशिष्ट सेवापदक देऊन गौरवले.
३० जानेवारी, १९१६ रोजी जनरल कृष्णराव यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म. ( मृत्यू: ३० जानेवारी, २०१६)
समीक्षक, बौद्ध तत्त्वज्ञानाचा, सौंदर्यशास्त्राचा गाढे अभ्यासक, राजा ढाले – लिटल मॅगझिनच्याचळवळीवर तेव्हाच्या मार्क्सवादी विचारवंतांनी अराजकवादी म्हणून ठपका ठेवला. मात्र, शैलीतील बंडखोरीच्या निमित्ताने सुरू झालेला राजा ढाले यांचा हा प्रवास पुढे आशय व तत्त्वज्ञानाच्या बंडखोरीपर्यंत गेला. यातून दलित साहित्य, ज्याला ढाले आग्रहपूर्वक आंबेडकरी साहित्य असे संबोधत, ते आंबेडकरवाद व मार्क्सवादाचा विचार घेऊन सशक्तपणे उभे राहिले. नामदेव ढसाळ आणि बाबूराव बागूल हे थोर साहित्यिक या धारेचे पाईक झाले, तर दुसरीकडे, चित्रे, शहाणे यांच्यासारख्यांनी अस्तित्ववादी साहित्याची निर्मिती केली व नेमाडेंच्या रूपाने देशावादी साहित्याची पायाभरणी झाली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बावडा या गावी झालेल्या दलित अत्याचाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक नवा झंझावात १९७२च्या सुमारास उभा राहिला, त्याचे नाव दलित पँथर. या संघटनेचे दोन प्रमुख खांब होते. एक राजा ढाले व दुसरे नामदेव ढसाळ. या संघटनेचे आयुष्य हे उणेपुरे दोन वर्षांचेही नव्हते.
मात्र, या संघटनेमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सांस्कृतिक व राजकीय वातावरण इतके ढवळून निघाले की, आजही साहित्य किंवा राजकीय क्षेत्रातील बंडखोर हे स्वतःला पँथरच्या परंपरेतील म्हणवून घेण्यात भूषण मानतात. याचे मुख्य कारण सत्तरच्या दशकात राज्यातील दलित अत्याचारांच्या वाढलेल्या घटना व त्यातून दलित समाजात आलेली हताशा व त्या निमित्ताने एकंदरच पुरोगामी वर्तुळात निर्माण झालेली अस्वस्थता, तसेच राजकीय नैराश्याला पँथरने छेद दिला. पँथरचा जाहीरनामा ढसाळ यांनी जाहीर केला, त्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह कार्ल मार्क्सच्या खांद्यावर आम्ही उभे असून वर्णलढा व वर्गलढा यांची वाटचाल एकत्रच व्हायला पाहिजे’, असे नमूद होते. ढालेंनी या जाहीरनाम्यावर ‘नामा जाहीर’ अशी टीका केली कारण ढाले हे कट्टर मार्क्सवादविरोधी होते.
लिटल मॅगझिनच्या चळवळीतही बाबूराव बागूल यांच्याशी मार्क्सवादी विचारधारेवरून त्यांचे खटके उडत होते.
आंबेडकरावादी तत्त्वज्ञानाचे अन्वयार्थ लावणाऱ्या दादासाहेब गायकवाड व बी. सी. कांबळे या दोन धारांपैकी ढालेंनी कांबळे धारेला आपले मानले. राज्यघटनेच्या आधारे पुढे संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. पँथरनंतर त्यांनी मास मूव्हमेंट या संघटनेची घोषणा केली. मात्र, अफाट वाचन व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असलेल्या ढाले यांच्या या संघटनेला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. पुढे रिपब्लिकन ऐक्यानंतर ढाले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात राहिले. प्रकाश आंबेडकर यांचे जुन्या आंबेडकरी नेत्यांशी फारसे जमले नाही, तरी ढालेंसारख्या बुद्धिवादी व स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याशी त्यांनीही जुळवून घेतले. डॉ. आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन शिकून पुढे आलेल्या शोषित घटकांमधील पहिल्या पिढीचे ढाले हे प्रतिनिधी होते. ढालेंनी विद्वत्तेच्या व स्वच्छ राजकीय चारित्र्याच्या आधारावर महाराष्ट्रातील हजारो तरुणांना प्रेरित केले. वयाच्या सत्तरीतही ढाले तरुणांसोबत स्वतःच्या विद्वत्तेचा कुठेही बडेजाव न करता मोकळीढाकळी चर्चा करीत. त्या चर्चेतूनच प्रेरणा घेऊन राज्यात अनेक तरुणांनी आंबेडकरवादी विचारांच्या संघटना बांधल्या व अनेक लढे उभे केले. ढाले यांचा हा गुण पुरोगामी वा आंबेडकरी चळवळीतील फार कमी नेत्यांपाशी आहे.
आज देशात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण राजकीय व सांस्कृतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, आंबेडकरी चळवळीने, पँथरपासून आजपर्यंत केलेल्या भौतिक, सामाजिक, राजकीय प्रगतीची परखड चिकित्सा झाली पाहिजे, त्यातून काय गमावले व काय कमावले, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. तीच राजा ढाले यांच्यासारख्या बंडखोर योद्ध्याला खरी श्रद्धांजली ठरेल.
• २०१९ :पँथर, बालवाङ्मयकार, समीक्षक, बौद्ध तत्त्वज्ञानाचा, सौंदर्यशास्त्राचा गाढे अभ्यासक, संपादक व स्वच्छ चारित्र्याचा राजकीय नेते राजा ढाले यांचे निधन ( जन्म : ३० सप्टेंबर १९४० )
- घटना :
६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
• मृत्यू :
• १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
• १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.
२०२०: सरकारी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना एक वेगळे पण जतन करून जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन ( जन्म : ५ फेब्रुवारी, १९४९ )
- जन्म :
१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)
१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै२०१३)
१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.
आपला दिवस मंगलमय जावो