माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी (वय ८४ ) यांचे शुक्रवारी (दि.२६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा त्यांचा नावलौकि होता.

रेड्डी यांनी जिल्हाधिकारी म्हणून धुळे, ठाणे येथे काम केले होते. राज्याच्या साखर आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि साखर क्षेत्राला नवी दिशा दिली.. त्यांच्या कारकिर्दीत सध्याच्या साखर संकुल वास्तूचे भूमिपूजन झाले आणि बांधकाम पूर्ण होऊन या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्याच कारकिर्दीत १ जानेवारी २००१ रोजी झाले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत ए. आर. अंतुले यांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ मुंबई मॅरेथॉनशी संलग्न होते.
Arvind Reddy no more

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »