सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली :  पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले.

दरम्यान, उन्हाचे चटके आणि वाऱ्याचा वेग यामुळे क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते.  यामुळे या आगीत तब्बल ४० ते ५० एकरातील तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळण्यानंतर काहीवेळातच किर्लोस्करवाडी, क्रांती साखर कारखाना व पलूस नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पूर्णतः नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला कठीण जात होते. काही तासांनंतर मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यात काहीअंशी अग्निशमन दलाला यश आले. अनेक शेतकरी ऊसतोडीच्या प्रतीक्षेत असतानाच या आगीने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी परिसरातून मोठ्या प्रमाणात वीज वाहक तारा गेल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »