आज आषाढी एकादशी

आज रविवार, जुलै ६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १५, शके १९४७
सूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १५:३६ चंद्रास्त०२:४७, जुलै ०७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : देवशयनी एकादशी – २१:१४ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – २२:४२ पर्यंत
योग : साध्य – २१:२७ पर्यंत
करण : वणिज – ०८:०८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २१:१४ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : तूळ – १६:०१ पर्यंत
राहुकाल : १७:४१ ते १९:२०
गुलिक काल : १६:०२ ते १७:४१
यमगण्ड : १२:४३ ते १४:२३
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १७:३४ ते १८:२७
अमृत काल : १२:५१ ते १४:३८
वर्ज्य : ०३:०७, जुलै ०७ ते ०४:५३, जुलै ०७
। माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी ।
। माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा ।।
खरे तर प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचे दर्शन मिळणे हे सोपे नसते. तरीही वारकरी दर्शनासाठी वेळ देऊन दर्शन देतात. असे असले तरी बहुतांश वारकरी मंडळी प्रदक्षिणा आणि कळसाचे दर्शन यावरच समाधान मानतात.पंढरपूरला आलेला जनताजनार्दन हाच विठुराया मानून त्याचे दर्शन झाले तरी श्री विठ्ठलाचे दर्शन झाले असे मानतात.
।। पंढरीच्या लोका नाही अभिमान । पाया पडे जन एकमेका ।।
असे म्हणतात.एका वेगळ्याच विनम्र भावाचे दर्शन या ठिकाणी होते. वारकरी लोक समोरच्या प्रत्येक वेळी व्यक्तीला माऊली असे संबोधतात. ही माऊली कोण?
।। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली । येणे निगमवल्ली दाविली जगा ।।
अर्थात संत ज्ञानेश्वर माऊली हे प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आहे. अशी भगवत भक्तांची भावना असते. या भावनेने ते एकमेकांना वारकरी म्हणतात. असे हे विठ्ठलमय झालेले पंढरपूर पाहणे हा वेगळाच सोहळा असतो.
आळंदी पंढरपुर चे पालखीबरोबर वारी करणे हे प्रत्येक विठ्ठल भक्ताचे स्वप्न असते. काही लोकांना ते सहज शक्य असते. तर काही लोक आवर्जून वेळ काढून वारी करतात. आनंद लुटतात.ही आनंद वारी प्रत्येक भाविक भक्ताला मिळावी अशी विठुरायाच्या चरणी माझी प्रार्थना आहे.
आज आषाढी एकादशी – पंढरपूर यात्रा आहे.
“भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही” हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून श्री गुलाबराव् महाराजांनीं मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला.
श्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एकअसामान्य अलौकिक सन्त होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील , आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रन्थ लिहिले आहेत.
सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी संगितले. “भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत” असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती.
आर्य “वंश” असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्स म्यूलर व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होते.
अंध असलेल्या गुलाबराव महाराजांनी अकोल्याच्या एका चित्रकाराकरवी ज्ञानेश्वर माउलीचे एक चित्र तयार करून घेतले होते. याच चित्राच्या आधारे नंतर ज्ञानेश्वर माउलींचा फेट्यातील समाधिस्थ बसलेले चित्र विविध चित्रकारांनी साकारले. ते चित्र आजही या ज्ञानेश्वर मंदिरात अग्रभागी लावण्यात आले आहे. गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ संपदेत आज अत्यंत दुर्मिळ असलेल्या ग्रंथांचाही समावेश आहे. या ग्रंथसंपदेची संख्या दोन हजाराहून अधिक आहे. शांकर मताचे मंडण असलेला भामती, चित्सुखी, अद्वैतसिद्धी, खंडण खंड खाद्यम, बायबल, कुराण, प्लेटो, हेगेल, मायर्स, डार्विन, स्पेन्सर अशी मोठी ग्रंथसंपदा आहे. दर्शनशास्त्र, संगीत, काव्य, योग, षड्दर्शन, सांख्य, न्याय, धर्म अशा असंख्य विषयांवरचे ग्रंथ गुलाबराव महाराजांनी अभ्यासले. आत्मसात केले आणि त्यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले.
गुलाबराव महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देणारी ही ग्रंथसंपदा याच मंदिरात आज कपाटबंद आहे. या ग्रंथांना हात लागणार नाही, याची पुरेपूर काळजी या मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतली आहे, हे विशेष! चौतीस वर्षांच्या अल्पायुष्यकाळात गुलाबराव महाराजांनी एवढे ज्ञान कसे प्राप्त केले, या प्रश्नाचे पूर्ण समाधानकारक नसले तरी अल्पसे उत्तर या ग्रंथांच्या दर्शनातूनच आपल्याला मिळते.
छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. खरे पाहता हे ज्ञानेश्वर मंदिर बुद्धिवान तरुणांच्या वर्दळीचे स्थान असायला हवे. मात्र, स्थिती तशी नाही !
१८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
दाक्षिणात्य संगीताचे गायक डाॅ एम बालमुरलीकृष्णन – हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.
अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.
कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.
डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.
१९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर , २०१६ )
- घटना :
१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
१७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
१८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
१८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.
१९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
२००६: चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
• मृत्यू :
• १९८६: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल, १९०८)
• १९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी , १९२१)
• १९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)
• २००२: भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर, १९३२)
• २०२० : सध्या असलेला ‘सी.एस.आर. (Corporate social responsibility) फंड’ची मूळ संकल्पना पंडितकाका कुलकर्णी ह्यांनी १९७०च्या दरम्यानच ‘फाय फाउंडेशन’चे पुरस्कार देऊन सुरू केली होती.
महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील उद्योजक पंडितराव कुलकर्णी यांचे निधन ( जन्म : ४ जुलै , १९२८ )
- जन्म :
१८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट, १९२५)
१८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
१८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
१९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९५३)
१९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
१९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट, १९९५ )
१९२७: लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
१९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर , २०१६ )
१९३५: चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.
१९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.
१९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.
१९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.