अशोक पाटील ‘माळेगाव’चे कार्यकारी संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी अशोक पाटील संचालकपदी (एमडी) अशोक राजाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच डिस्टलरी मॅनेजर म्हणून नंदकुमार सुखदेव जगदाळे यांचीही नियुक्ती कारखाना प्रशासनाने केली आहे. पाटील यांना पदाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना- गजानन शुगर- राजूरी, कोल्हापूर, गजानन गंगाखेड शुगर, भीमा सहकारी साखर कारखाना – टाकळी, बस्मतनगर हिंगोली येथील पूर्णा शुगर फॅक्टरीमध्ये पाटील यांनी काम केले आहे.

‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांच्या संचालक मंडळाने नुकत्याच घेतलेल्या विशेष बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने पाटील यांना शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »