पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.

राज्यात पुणे येथील साखर सहसंचालक पद महत्त्वपूर्ण मानले जात असल्याने साखर आयुक्तालयातच बैठक व्यवस्था असलेल्या या कार्यालयातंर्गत पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांतील कारखान्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि आवश्यक त्या आयुक्तालयाच्या सूचनांन्वये पाठपुरावा, कारवाई, प्रस्ताव स्वीकारणे आदी महत्त्वाची कामे केली जातात. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या निवडणुकांचे कामकाजही याच कार्यालय स्तरावरुन झाले आहे.

प्रवीण फडणीस यांनी पदभार स्वीकारला

साखर आयुक्तालयातील रिक्त असलेल्या साखर सह-संचालकपदी (प्रशासन) अमरावती येथील विभागीय सह निबंधक प्रवीण फडणीस यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यांनी या पदाचा पदभारही स्वीकारला आहे. त्यामुळे आयुक्तालयातील सर्व पदांवर आता अधिकारी पूर्णवेळ मिळाल्याने कामकाजात गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »