रासकर यांना जीवन गौरव पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी.एम. रासकर यांना , साखर उद्योगामधील अतुलनीय योगदानाबद्दल “दि शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया” (STAI) या नामांकित संस्थेकडून सन २०२३ मधील जीवन गौरव पुरस्कार तिरुवनंतपूरम येथील वार्षिक परिषदेत प्रदान करण्यात आला.

श्री. रासकर गेल्या चार दशकांपासून साखर उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी तंत्रज्ञ, प्रशासक, व्यवस्थापन तज्ज्ञ अशा विविध भूमिकांमध्ये या क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.

हा माझ्या एकट्याचा गौरव नसून, सुरुवातीपासून मला प्रोत्साहन देणाऱ्या, संधी देणाऱ्या आणि नेहमी सहकार्य करणाऱ्या संस्था – मंडळींचाही गौरव आहे, अशी प्रतिक्रिया श्री. रासकर यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »