बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर निवड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अनुभवी व्यक्तिमत्त्व श्री. बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’ च्या एक्सिक्युटिव्ह  कौन्सिल मेंबर पदी (कार्यकारी मंडळ सदस्य) निवड झाली आहे. ‘भारतीय शुगर’ गेल्या पाच दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यासोबत काम करणे सन्मानाचे मानले जाते.

श्री. सुतार गेल्या चार दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात योगदान देत आहेत, त्यांचा अनुभव, ज्ञान आणि कामाप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे ‘भारतीय शुगर’ने म्हटले आहे. श्री. सुतार यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सहकार भूषण 2013, एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम  को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज इन इंडिया 2025 (चिनी मंडी अवॉर्ड) अशा सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

सहकार कारखानदारीतील त्यांचे 39 वर्षाचे सलग योगदान आहे. प्रशासकीय कामकाज, आर्थिक शिस्त, तांत्रिक गुणवत्ता व पारदर्शक कारभार यावर त्यांचा साखर कारखानदारीतील मोठा अनुभव  त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी त्यांनी वसंतदादा सह. साखर काखाना, वारणा सह. साखर कारखाना, कर्मयोगी-इंदापूर, संजीवनी समूह येथे संपूर्ण कामकाज पाहिले आहे.

‘शुगरटुडे’च्या वतीने श्री. सुतार यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »