बा.सी.मर्ढेकर

आज गुरुवार, मार्च २०, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ३०, , शके १९४६
सूर्योदय : ०६:४३ सूर्यास्त : १८:४९
चंद्रोदय : ००:००, मार्च २१
चंद्रास्त : १०:१३ शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०२:४५, मार्च २१ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – २३:३१ पर्यंत
योग : वज्र – १८:२० पर्यंत
करण : गर – १३:४४ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०२:४५, मार्च २१ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १४:१७ ते १५:४८
गुलिक काल : ०९:४४ ते ११:१५
यमगण्ड : ०६:४३ ते ०८:१३
अभिजित मुहूर्त : १२:२२ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १०:४५ ते ११:३३
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२४
अमृत काल : ११:५७ ते १३:४४
वर्ज्य : ०५:३९, मार्च २१ ते ०७:२४, मार्च २१
१५९९: फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. ( फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ )
नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरुशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होत आहे. परामर्थ सफल व्हावयाचा असेल तर 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. 1 शिष्य, 2 गुरु, 3 सेवा, 4 उपदेश, 5 ज्ञान, 6 कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरुपण संपते. शिष्याचे शिष्यपणा संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते. गुरु आणि शिष्य एकरूप होतात.
नाथ षष्ठीमध्ये हे सहा योग एकत्र येतात. षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे, दीन केले आहे पण श्रीसंत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी म्हणतात.
आज नाथषष्ठी आहे.
सूर्य 20 / २१ मार्च व २२ आणि २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात.
आज विषुवदिन आहे.
आज जागतिक चिमणी दिवस आहे.
पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!
कवी – बा.सी.मर्ढेकर
आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं कसं आहे हे किती तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे अन उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.
बा. सी. मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.
• १९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर, १९०९)
अवंतीबाई लोधी एक पराक्रमी, धैर्यशील आणि प्रसंगावधानी स्त्री होती. मध्यप्रदेशामधील सिवनी या जिल्ह्यात राव जुंझारुसिंह यांच्या राजमहालात या अवंतीबार्इंचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ या दिवशी झाला. तिचे नाव मोहिनी ठेवण्यात आले. बालपणापासूनच तिला अश्वसंचालन, खड्गसंचालन, तिरंदाजी (धनुर्विद्या), सैनिकी शिक्षण इत्यादी शूरवीरतेला आवश्यक अशा सर्वच विद्यांची अतिशय आवड होती.
१८५७ च्या मे मध्ये राजा विक्रमादित्यांचे निधन झाले; पण पतीनिधनाच्या दुःखाने विचलित न होता, न गोंधळता, धैर्याने या राणीने संपूर्ण राज्याचा दौरा केला. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन, प्रजेचे मन जिंकून तिने आपले रायगडचे राज्य अधिकाधिक विस्तृत केले. तिच्या त्या राज्यांचे क्षेत्रफळ ४००० वर्गमीटर होते. त्यामध्ये मंडळा, हिंडोर, सोहागपूर, अमरकंटक इत्यादी जिल्हे आणि अन्य भूभाग होते.
पुढे नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली छेडल्या गेलेल्या स्वातंत्र्यसंग्रामांत ज्या धैर्य आणि चातुर्य या गुणांनी आपले विस्तृत राज्य कंपनी सरकारच्या हातात न जाऊ देता कसे सांभाळून राखले, याविषयी तिचे गौरव-गुण गाताना इंग्रज सेनापती (कप्तान) वॉडिंगटन म्हणतो, ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात रायगडचे राज्य तिने इतके सुरक्षित ठेवले की, अनेक मास त्या भोवती सैनिक वेढा टाकूनही आम्हाला ते जिंकता आले नाही.’
स्वतःप्रमाणे सभोवतालच्या जहागिरदार आणि संस्थानिकांना सजग करून प्रेरणा देणारी धैर्यशील राणी – राणी अवंतीबाई हे जाणून होती की, आज नाही तर उद्या हे इंग्रज कंपनी सरकार आपल्याच समाजातील देशद्रोही फितुरांच्या साहाय्याने आपल्याला देशोधडीला लावून वा आपले प्राण घेऊन आपले राज्य बळकावून बसतील. असे होऊ नये; म्हणून प्रयत्नशील रहायलाच हवे, हे जाणून तिने आपल्या राज्याच्या सभोवतालच्या राजभूमी अधिकार्यांना (जहागिरदारांना), लहान-मोठ्या संस्थानिकांना स्वहस्ते पत्र आणि बांगड्या पाठवून स्वातंत्र्याप्रित्यर्थ सजग रहाण्याचा संदेश दिला. यापाठी उद्देश हा होता की, स्वातंत्र्य सतत टिकून रहावे, अशी इच्छा नसेल, तर या बांगड्या हातात घालून या इंग्रज शासनाचे दास्यत्व स्वीकार करा !
राणी अवंतीबाईने क्रांतीचे नेतृत्त्व समर्थपणे स्वीकारून आपल्या गुणांमुळे लोकप्रियता मिळवणे – योजनेनुसार इंग्रजांविरूद्ध स्वातंत्र्यसंग्राम छेडला गेला होता आणि तो यशस्वीही होत होता; पण ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीप्रमाणे काही शिंदे, होळकर यांसारखे भारतीय संस्थानाधिपतीच ज्या वेळी इंग्रजांना जाऊन मिळाले, त्या वेळी या यशस्वी स्वातंत्र्यसंग्रामाला खीळ बसू लागली. यशाच्या वजनाने इंग्रजांचे पारडे जड होऊ लागले; पण राणी अवंतीबाई हताश झाली नाही. तिने आपल्या राज्यातून इंग्रजांनी नेमलेले ‘कोर्ट ऑफ वार्डस्’च्या अधिकार्यांना हाकलून लावले आणि आपल्या राज्याच्या सुरक्षिततेचे उत्तरदायित्व स्वतःकडे घेऊन क्रांतीचेही नेतृत्व स्वीकारले. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्यास्तव ती लोकांना प्रेरित करू लागली. स्वतःच्या प्राणांचीही तिने पर्वा केली नाही. तिच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासही लोक तत्पर रहात होते, इतकी तिची लोकप्रियता वाढू लागली.
आपल्या तलवारीने शौर्याची पराकाष्ठा करणार्या राणीवर तिच्याच सैन्यातील एका फितुराने तलवारीचा घाव मागून घालून तिला यमसदनी पाठवणे – त्या वेळेस त्या क्षेत्रातील नेतृत्व जबलपूरच्या ५२ व्या पलटनीचे अधिकारी कॅप्टन वॉडिंग्टन यांच्याकडे होते. इंग्रज सेना आणि स्वातंत्र्यप्रिय क्रांतीकारकांमध्ये मंडळा या क्षेत्राजवळ, खैरी गावाच्या निकट बेधुंद युद्ध चालू झाले. राणी अवंतीबाईच्या क्रांतीकारी सेनेच्या जोशासमोर इंग्रज पराभूतच होत चालले होते. रणक्षेत्र सोडून वाडिंग्टन २३ नोव्हेंबर १८५७ ला पळून गेला होता; पण तो दिवा नरेशाचे साहाय्य आणि विपुल सैन्य घेऊन परत आला. राणी त्याच्यावर चालून गेली. घनघोर युद्ध झाले. शत्रुला नामोहरण करण्यासाठी तोफखाना विखुरला गेला, बंदुकी निस्तेज झाल्या आणि तलवारी तळपू लागल्या. राणी अवंतीबाई तलवारीनिशी वॉडिंग्टनवर तुटून पडली; पण तिच्याच सैन्यातील एका फितुराने तिच्यावर मागून तलवारीचा घाव घातला. स्वातंत्र्यास्तव स्वकर्तव्य पार पाडीत असतांनाच, त्या रणांगणी तिला यमसदनी पाठवले.
या देशाचे स्वातंत्र्य अशाच फितुरांनी घालविले आहे, हे कधीही विसरणे शक्य नाही. भारतीय शौर्यमय इतिहास अशाच देशद्रोही फितुरांनी नासवला, तर देशप्रेमी, स्वातंंत्र्यवीर अशा क्रांतीवीरांनी, क्रांतीदेवी अवंतीबाई सम नारींनी तो ‘यावश्चंद्र दिवाकरौ’ उजळवीत ठेवला.’
१८५८ : महाराणी अवंतीबाई लोधी यांना वीर मरण ( जन्म : १६ ऑगस्ट, १८३१ )
- घटना :
१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
२०२० : २०१२ मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना नराधमांना आज पहाटे फासावर चढवण्यात आले आहे. निर्भयाच्या या चारही दोषींना पहाटे साडे पाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवलं गेलं आहे. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे.
• मृत्यू :
• २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी, १९१५)
२०१५ : महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचे निधन ( जन्म : ३ सप्टेंबर, १९२३ )
- जन्म :
१९१४ : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक. राम नारायण गबाले यांचा जन्म ( मृत्यू : ९ जानेवारी , २००९ )
१९२०: नाटककार पद्मश्री पुरस्कार सन्मानित वसंत कानेटकर यांचा जन्म. ( मृत्यू : ३१ जानेवारी, २०००)
१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.