बाबा आमटे
![baba amte](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/02/baba-amte-e1738257210956.jpg?fit=768%2C435&ssl=1)
आज रविवार, फेब्रुवारी ९, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २० , शके १९४६
सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६
चंद्रोदय : १५:३६
चंद्रास्त : ०५:३०, फेब्रुवारी १०
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – १९:२५ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – १७:५३ पर्यंत
योग : विष्कम्भ – १२:०७ पर्यंत
करण : बव – ०७:४७ पर्यंत
द्वितीय करण : बालव – १९:२५ पर्यंत
क्षय करण : कौलव – ०७:०८, फेब्रुवारी १० पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १७:१० ते १८:३६
गुलिक काल : १५:४४ ते १७:१०
यमगण्ड : १२:५३ ते १४:१९
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : १७:०४ ते १७:५०
अमृत काल : ०७:५८ ते ०९:३४
वर्ज्य : ०५:५७, फेब्रुवारी १० ते ०७:३३, फेब्रुवारी १०
गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला.
त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले.
गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली.
नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल.
लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसे करावे हे शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला.
आज गोंदवलेकर महाराज जयंती आहे तिथी नुसार ( १९ फेब्रुवारी १८४५ )
श्री बाबा आमटे – त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई . त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.
त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.
बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४९ रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.
१९७३ साली गडचिरोली जिल्हयातील मदिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.
बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.
भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार (सन् १९७१) व पद्म विभूषण (१९८६) देऊन सन्मानित केले.
तसेच डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत १९९९, डी.लिट – १९८० नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , डी लिट – १९८५ – ८६ पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र, देसिकोत्तमा १९८८ – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.
बाबांनी सुरु केलेल्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या पुढील पिढ्या कार्यरत आहे.
• २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
- घटना :
१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
• मृत्यू :
१८९७ : भारतीय कामगार पुढारी रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे त्यांचे निधन ( जन्म : १३ ऑगस्ट, १८४८ )
• १९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.
• १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)
• १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
• १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)
• २०००: चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर, १९१६ )
• २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
जन्म :
१८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
१९१७: गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)
१९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)
१९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
१९४८ : सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक गणेश वसंत तोरसेकर तथा भाऊ तोरसेकर यांचा जन्म.