विठ्ठलराव शिंदे कारखाना अध्यक्षपदी पुन्हा बबनराव शिंदे  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

माढा : पिंपळनेर, टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली .

२०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी २१ संचालकांची ही निवड प्रक्रिया मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी पार पडली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुर्डूवाडीच्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी काम पाहिले.

कारखान्याच्या स्थापनेपासूनच येथील निवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा कायम राहिली आहे. बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असून, शेतकऱ्यांना वेळेवर बिले देणारा कारखाना म्हणून याची ओळख आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »