भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

*आज शनिवार, डिसेंबर ६, २०२५ युगाब्द : ५१२७*

*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) १५, शके १९४७*

सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:०१

चंद्रोदय : १९:२८ चंद्रास्त : ०८:२३

शालिवाहन शक : संवत् : १९४७

संवत्सर : विश्वावसू

दक्षिणायन

ऋतु : हेमंत

चंद्र माह : मार्गशीर्ष

पक्ष : कृष्ण पक्ष

तिथि : द्वितीया – २१:२५ पर्यंत

नक्षत्र : मृगशीर्ष – ०८:४८ पर्यंत

क्षय नक्षत्र : आर्द्रा – ०६:१३, डिसेंबर ०७ पर्यंत

योग : शुभ – २३:४६ पर्यंत

करण : तैतिल – ११:०७ पर्यंत

द्वितीय करण : गर – २१:२५ पर्यंत

सूर्य राशि : वृश्चिक

चंद्र राशि : मिथुन

राहुकाल : ०९:४४ ते ११:०७

गुलिक काल : ०६:५९ ते ०८:२१

यमगण्ड : १३:५२ ते १५:१५

अभिजित मुहूर्त : १२:०८ ते १२:५२

दुर्मुहूर्त : ०६:५९ ते ०७:४३

दुर्मुहूर्त : ०७:४३ ते ०८:२७

अमृत काल : २१:१८ ते २२:४३

वर्ज्य : १६:१८ ते १७:४४

*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर* म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली.

त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. या महामानवास विनम्र अभिवादन.

*• १९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण . (जन्म: १४ एप्रिल १८९१)*

*क्रांतिसिंह नाना पाटील* हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात.

त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता . पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला . साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता . त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले.

भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली . प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते .

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

*• १९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट, १९००)*

*१९९२ : बाबरी मस्जिद ढाचा पडला व प्रभु श्रीरामाचे मूर्तीची स्थापना झाली.*

*अग्निहोत्र –*

*सूर्योदयाच्या वेळी –*

सूर्याय स्वाहा। सूर्याय इदं मम ।

प्रजापतये स्वाहा। प्रजापतय इदं मम ।

*सूर्यास्ताच्या वेळी-*

अग्नये स्वाहा। अग्नय इदं मम ।

प्रजापतये स्वाहा। प्रजापतय इदं मम ।

सुर्योदय व सुर्यास्तावेळी केलेया अग्नीहोत्राने वातावरणशुध्दी व पूर्णतया समर्पणची स्थिती निर्माण होते.

अक्कलकोटचे गजानन महाराज आणि अग्निहोत्राचा संबंध असा आहे की, श्री गजानन महाराज हे अग्निहोत्राचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी अग्निहोत्राचे पुनरुज्जीवन केले आणि त्यांच्या अनेक अनुयायांनी अग्निहोत्र जपण्याचे काम केले. अक्कलकोट येथे असलेल्या त्यांच्या मठामध्ये सामुदायिक अग्निहोत्र केला जातो, ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.

असे मानले जाते की नित्य अग्निहोत्रामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि मनःशांती मिळते.

*१९८७ : अग्नीहोत्रानचा प्रचार आणि प्रसार करणारे अक्कलकोटचे गजानन महाराज यांचा समाधी दिन ( जन्म : १७-०५-१९१८ )*

* *घटना :*

*

१७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

१८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

१९१७: फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

१९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

१९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

१९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

*• मृत्यू :*

• १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी, १९०२)

* *जन्म :*

१८५३: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर, १९३१)

१८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे , १९१९)

१९१६: गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर, १९९२)

१९२३: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर, २००२)

१९३२: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी, २००७)

१९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

१९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »